हैदराबाद- ज्युनियर एनटीआर या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता नंदामुरी तारका रामाराव ज्युनियर, २० मे रोजी आपला ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. जगभरातील त्याचे चाहते हा दिवस उत्सवासारखा साजरा करत आहेत. हा रांगडा तेलुगू स्टार त्याच्या चाहत्यांना खूप आवडतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. अगदी कॅनडा आणि जपानमधील चाहतेही त्याचा हा खास दिवस ऑनलाइन समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साहाने साजरा करताना दिसतात.
ज्युनियर एनटीआर बर्थडे सेलेब्रिशन - एका व्हिडिओमध्ये, ज्युनियर एनटीआरचे जपानी चाहते त्याचा वाढदिवस त्याचे कटआउट्स प्रदर्शित करून आणि मेणबत्त्या आणि केकसह संपूर्ण जागा सजवून साजरा करताना दिसत आहेत. दुसर्या व्हिडिओमध्ये, कॅनेडियन चाहत्यांनी ज्युनियर एनटीआरचे झेंडे हातात घेतले आणि त्याला 'वाढदिवसाच्या शुभेच्छा' देताना दिसले. यातून ज्युनियर एनटीआर त्याच्या चाहत्यांचे किती प्रेम आहे हे व्हिडिओवरून स्पष्टपणे दिसून येते. आंध्रप्रदेश आणि तेलंगणात ज्यनियर एनटीआरचा फार मोा चाहता वर्ग आहे. त्याचे अनेक फॅन्स क्लब आहेत. या फॅन्स क्लबच्या वतीने वाढदिवसाची जंगी तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी रक्तदान शिबीरांचेही आयोजन करण्यात आले आहे, तर काही ठिकाणी गरीबींसाठी अन्नदान, फळ व मिठाई वाटप असे उपक्रमही चाहते राबवत आहेत.