मुंबई: नवाजुद्दीन सिद्दीकी आणि नेहा शर्मा स्टारर 'जोगिरा सारा रा रा' हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण या चित्रपटाचा रिलीज हा पुढे ढकलले गेले आहे. या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता मात्र काही अडचणीमुळे या चित्रपटाच्या निर्मात्यांनी रिलीज लंबणीवर टाकले. हा चित्रपट आता 12 मे ऐवजी 26 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. कुशन नंदी दिग्दर्शित 'जोगिरा सारा रा रा' या चित्रपटाचे प्रमोशन मंगळवारी दमदार सुरू होते. अचानकच 12 मे रोजी होणाऱ्या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलल्याची माहिती देण्यात आली. या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. आता त्यांना 26 मे पर्यत वाट बघावी लागणार आहे.
चित्रपटाचा रिलीज : चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून 'जोगिरा सारा रा रा' चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आणि नवीन तारखेबद्दल माहिती शेअर केली आहे. या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या लक्षात घेऊन २ आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होणार असे पोस्टद्वारे सांगण्यात आले आहे. शिवाय या चित्रपटामधील अभिनेत्री नेहा शर्माने देखील तिच्या 'जोगिरा सारा रा रा' चित्रपटाविषयाची माहिती तिच्या ट्विटर अकाऊंटद्वारे एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना दिली. तिने म्हटले, 'मला आशा आहे की तुमचा दिवस चांगला जात आहे. तुमच्यासाठी महत्वाची माहिती. आमचा चित्रपट १२ मे रोजी प्रदर्शित होणार होता, तो आता २६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. कृपया तारीख लक्षात घ्या'. असे तिने तिच्या पोस्टद्वारे सांगितले.