महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये जितेंद्र जोशी ठरला सर्वोकृष्ट अभिनेता! - Jitendra Joshi for the role in the film Godavari

‘गोदावरी’ चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी जितेंद्र जोशी याची न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF) मध्ये सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून निवड झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही नक्कीच अभिमानाची बाब आहे.

जितेंद्र जोशी
जितेंद्र जोशी

By

Published : May 17, 2022, 5:03 PM IST

मुंबई - मराठी चित्रपट आशयघनतेसाठी जाणले जातात आणि त्यातील बरेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत बाजी मारीत असतात. मानसन्मानाबरोबरच अनेक पुरस्कारही पटकावीत असतात. त्यातीलच एक म्हणजे ‘गोदावरी’. यातील प्रमुख भूमिकेतील जितेंद्र जोशी याची न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF) मध्ये सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून निवड झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही नक्कीच अभिमानाची बाब आहे.

जिओ स्टुडिओजच्या बहुप्रतीक्षित अशा 'गोदावरी' चित्रपटाने जगभरातील अनेक नामांकित राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपलं नाव कामवाल्यानंतर या चित्रपटाचे अभिनेता जितेंद्र जोशी यांची न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF) २०२२ च्या सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता 'गोदावरी'च्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे.

न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये जितेंद्र जोशी ठरला सर्वोकृष्ट अभिनेता

यापूर्वी या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. 'इफ्फी २०२१' मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता जितेंद्र जोशी आणि दिग्दर्शनातील विशेष ज्युरी पुरस्कार निखिल महाजन यांनी पटकावला आहे. तर न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये २०२२ मध्ये 'गोदावरी' या चित्रपटाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली होती. वॅनक्योवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये २०२१ मध्ये वर्ल्ड प्रीमिअर आणि न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये एशिया पॅसिफिक प्रीमिअरही दाखवण्यात आले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर शमीम कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रणकाराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

'गोदावरी'बाबत दिग्दर्शक निखिल महाजन म्हणाले, '''गोदावरी' या चित्रपटाला जगभरातून अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी झाल्यानंतर आता नामांकित अशा कान चित्रपट महोत्सवात स्क्रिनिंगसाठी निवडलेल्या पहिल्या पाच चित्रपटांमध्ये 'गोदावरी'चा समावेश करण्यात आला आहे. माझा अगदी जिवलग मित्र आणि या चित्रपटाचा अभिनेता जितेंद्र जोशी याची न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल (NYIFF) २०२२ च्या सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून निवड झाल्याबदल मला फार आनंद होत आहे. आयुष्य आणि मृत्य यांच्यातील गुंता सोडवण्याचा प्रयत्न 'गोदावरी'मध्ये करण्यात आला आहे. हा चित्रपट केवळ सतरा दिवसांमध्ये चित्रित करण्यात आला आहे."

ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित, निखिल महाजन दिग्दर्शित या चित्रपटात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा -कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 आजपासून सुरू, भारताला कन्ट्री ऑफ ऑनरचा दर्जा

ABOUT THE AUTHOR

...view details