महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

बिन लग्नाचे मूल झाल्यास माझी हरकत नाही, नात नव्याबद्दल बोलल्या जया बच्चन - नव्या नवेली नवीन पॉडकास्ट

जया बच्चन यांनी लग्नाआधी शारीरिक संबंध या निषिध्द मानल्या जाणाऱ्या विषयावर सडेतोड भाष्य केले आहे. नव्या नवेलीच्या नवीन पॉडकास्ट व्हॉट द हेल नव्यावर बेलताना जय बच्चन यांनी नात्याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेसाठी ठेवले आहे.

जया बच्चन
जया बच्चन

By

Published : Oct 29, 2022, 1:42 PM IST

Updated : Oct 29, 2022, 5:32 PM IST

मुंबई- ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी लग्नाआधी शारीरिक संबंध या निषिध्द मानल्या जाणाऱ्या विषयावर सडेतोड भाष्य केले आहे. जया म्हणाल्या की, ते अनेकांना "आक्षेपार्ह" वाटू शकते परंतु नातेसंबंधात शारीरिक आकर्षण आणि अनुकूलता खूप महत्वाची आहे. प्रशंसित अभिनेत्रीने असेही मत व्यक्त केले की तिची नात नव्या नवेली नंदा विवाहबंधनात प्रवेश करण्यापूर्वी माता होऊ इच्छित असल्यास तिला काही हरकत नाही.

मेगास्टार अमिताभ बच्चन यांची नात नव्या आणि तिची आई श्वेता बच्चन नंदा आणि आजी जया नव्याच्या नवीन पॉडकास्ट व्हॉट द हेल नव्यावर नातेसंबंधांवर काही मनोरंजक संभाषण करताना दिसत आहेत.

ताज्या एपिसोडमध्ये नातेसंबंधांचा काही सल्ला देताना जया बच्चन म्हणाल्या, "लोकांना माझ्याकडून हे आक्षेपार्ह वाटेल, परंतु शारीरिक आकर्षण आणि अनुकूलता खूप महत्त्वाची आहे. आमच्या काळात, आम्ही प्रयोग करू शकत नव्हतो. पण आजची पिढी ते करते आणि का करू नयेत? कारण दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यासाठी ते आवश्यक आहे. जर शारीरिक संबंध नसेल तर नाते फार काळ टिकणार नाही. तुम्ही फक्त प्रेम, ताजी हवा आणि अॅडजस्टमेंट यावर टिकू शकत नाही."

जया बच्चन यांनी तरुण पिढीला शारीरिक संबंधांबद्दल दोषी कसे वाटू नये यावरही आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, "तुमचे शारीरिक संबंध असतील आणि तरीही तुमचे नाते पूर्ण झाले नाही असे तुम्हाला वाटत असेल तर ते ठीक आहे."

जयासाठी एकमेव समस्याप्रधान पैलू म्हणजे "ढोंगी असणे." त्या म्हणाली की बहुतेक तरुण मुली यातून जातात पण ते त्यांच्या कुटुंबापासून लपवतात, कारण ते शारीरिक संबंधांबद्दल बोलत नाहीत.

जेव्हा जयाने विचारले की, "आम्ही लोकांवर बंधने का घालत आहोत?" यावर श्वेता पॉडकास्टवर म्हणाली, "हे महिलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहे. महिलांना त्यांच्या शरीराबद्दल काही म्हणता येत नाही. त्यांचे सर्व निर्णय पुरुष घेतात."

10 भागांची ऑडिओ मालिका IVM पॉडकास्टवर उपलब्ध आहे आणि ती इतर ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे.

हेही वाचा -Bigg Boss 16: सलमान खानने अब्दू रोजिकला घरातून बाहेर पडण्याची केली सूचना, निम्रत अहलुवालिया भावूक

Last Updated : Oct 29, 2022, 5:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details