Jawan Trailer SRK Dialogue: मुंबई - जवान चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रेक्षकांना भावला आहे. रक्षा बंधनाच्या सणाच्या निमित्ताने निर्मात्यांनी या बहुप्रतीक्षित ट्रेलरचे लॉन्चिंग केले. या चित्रपटातील शाहरुखचे सर्व डायलॉग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसताहेत. यात एक बाप आणि लेकाच्या नात्याशी संबंधित एक डायलॉग समोर आला आहे. याचा संबंध लोक किंग खानचा मुलगा आर्यन खानशी जोडून मोकळे झाले आहेत.
'जवान'च्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. शाहरुखच्या अॅक्शन सीन्सनी प्रेक्षकांची उत्कंठाही वाढवली आहे. यादरम्यान ट्रेलरमधील एका डायलॉगने सर्वांचे लक्ष वेधले आहे. शाहरुख खानचा डायलॉग 'बेटे को हाथ लगाने से पहले, बाप से बात कर' सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ट्रेलरमधील या डायलॉगवर सोशल मीडियात खूपच मजेशीर आणि चिक्कार प्रतिक्रिया पाहायला मिळताहेत.
एका युजरने लिहिलंय, 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर. करप्ट ईडी अधिकाऱ्यांना शाहरुखचा थेट संदेश.' लोक शाहरुखच्या या डायलॉगला आर्यन खान ड्रग केसशी जोडून सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत.
शाहरुख खानच्या जवान चित्रपटाच्या ट्रेलरचा पहिला प्रेक्षक आर्यन खान होता. हा ट्रेलर पाहिल्यानंतर आर्यनने आपल्या मित्रांना सांगितले की, आजवरचा वडीलांचा हा सर्वात जबरदस्त अॅक्शन ओरियंटेड सिनेमा आहे. त्याला ट्रेलर आवडला असून लोकांनाही आवडेल याची खात्री त्याने बाळगली होती. यापूर्वी पठाण चित्रपटाच्यावेळीही आर्यननेच पहिल्यांदा ट्रेलर पाहून उत्तम असल्याची हमी दिली होती.