मुंबई :बॉलिवूड पठाण शाहरुख खानच्या आगामी 'जवान' या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये फार जास्त चर्चा सुरू आहे. शाहरुखचा जवान हा चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. दरम्यान सध्याला चाहत्यांसमोर चित्रपटातून हळूहळू नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. अलीकडेच, शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट फिल्म्सच्या बॅनरने 'जवान' या चित्रपटचा प्रीव्ह्यू १० जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता रिलीज होणार असल्याची घोषणा केली होती, आणि आज शाहरुख खानने जवानचा प्रीव्ह्यू हा आपल्या चाहत्यांमध्ये शेअर केला आहे. शाहरुखच्या 'जवान' या चित्रपटाचा प्रीव्ह्यू हा हिंदीत आहे. आता जवान चित्रपटाच्या प्रीव्ह्यूने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाची वाट प्रेक्षक फार आतुरतने पाहत आहे. तसेच या चित्रपटात किंग खान आपल्या अनोख्या अंदजात दिसणार आहे. या चित्रपटात भरपूर अॅक्शन ड्रामा असल्यामुळे हा चित्रपट फार मनोरंजक असल्याचे दिसून येत आहे.
चित्रपट कधी प्रदर्शित होणार? :'जवान' या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथ चित्रपटांचे दिग्दर्शक अरुण कुमार उर्फ अॅटली यांनी केले आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत साऊथची सुपरहिट अभिनेत्री नयनतारा देखील दिसणार देखील आहे. तसेच या चित्रपटात संजय दत्त आणि दक्षिणेतील अभिनेता विजय सेतुपती यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'जवान' हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.