महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Jawan Prevue : 'जवान' चित्रपटातील एका लूकमुळे शाहरुख खान पुन्हा चर्चेत

शाहरुख खानचा जवान या चित्रपटाचा प्रीव्हयू हा आज रिलीज झाला आहे. या प्रीव्हयूमध्ये असे काही आहे ज्यामुळे आणखी या चित्रपटाबाबत चर्चा होत आहे.

Jawan Prevue
जवानचा प्रीव्हयू

By

Published : Jul 10, 2023, 5:21 PM IST

मुंबई : ब्लॉकबस्टर चित्रपट पठाणनंतर, शाहरुख खान पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाल करण्यासाठी आला आहे. शाहरुख खानने त्याच्या 'जवान' या चित्रपटाचा प्रीव्हयू म्हणजेच ट्रेलर नुकताच रिलीज केला आहे. 'जवान' या चित्रपटाचा ट्रेलर आज १० जुलै रोजी १०.३० वाजता रिलीज झाला आहे. 'जवान'चा प्रीव्ह्यू रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ निर्माण झाली आहे. जवानच्या ट्रेलरमध्ये शाहरुख खानचे अनेक लूक्स समोर आले आहेत. शाहरुख खानचा अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट 'जवान' याबद्दल चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. शाहरुख पहिल्यांदाच या चित्रपटात टक्कल पडलेला दिसणार आहे.

टॅटूचे काय आहे रहस्य :शाहरुख खान 'जवान' या चित्रपटात टक्कल पडलेला दिसत आहे. दरम्यान व्हायरल झालेल्या फोटोमध्ये शाहरुख खानच्या डाव्या कानावर हिंदीत लिहिलेला एक टॅटू दिसत आहे. या टॅटूमध्ये, पाकिस्तानच्या ध्वजावर असलेला चंद्र आणि तारा दिसत आहे. शाहरुख खानच्या या टॅटूमध्ये काय लिहिले आहे हे सध्याला तरी स्पष्ट झालेली नाही. मात्र आता शाहरुखच्या चाहत्यांचे सर्वाधिक लक्ष त्याच्या वेगवेगळ्या लूककडे लागले आहे. शाहरुखच्या 'जवान' या चित्रपटात दीपिका पदुकोणचा देसी लूक पाहायला मिळत आहे. जवान ट्रेलरमध्ये दीपिका ही एका फाईट सीनमध्ये दिसत आहे. दरम्यान साऊथ अभिनेता विजय सेतुपतीने पुन्हा एकदा आपल्या लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. या अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटची वाट चाहते फार आतुरने पाहत आहे.

दीपिकाची झलक :साऊथ अभिनेत्री नयनतारा ही ऑफिसरच्या भूमिकेत या चित्रपटात दिसत आहे. याशिवाय दंगल गर्ल सान्या मल्होत्राही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खानचा 'जवान' ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. रिलीज पूर्वीच या चित्रपटाला ब्लॉकबस्टर घोषित प्रेक्षकांनी केले आहे. या चित्रपटात निर्मात्यांनी दीपीकाच्या कास्टिंग आजवर गुप्त ठेवली होती. मात्र या चित्रपटात ती फार धमाकेदार अवतारात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील दिग्दर्शक अरुण कुमार उर्फ ​​अ‍ॅटली यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details