मुंबई :बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा 'पठाण' या चित्रपटानंतर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्याच्या मूडमध्ये आहे. किंग खानच्या 'पठाण' चित्रपटाने रुपेरी पडद्यावर जोरदार कमाई केली होती. दरम्यान आता शाहरुख हा 'जवान' चित्रपटाद्वारे रूपेरी पडद्यावर वादळ आणण्यासाठी सज्ज झाला आहे. 'जवान' हा चित्रपट रिलीज होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत, तर आता या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर येत आहे. या चित्रपटाचा अंतिम ट्रेलर येत्या बुधवारी किंवा गुरुवारी रिलीज होऊ शकतो. चाहते चित्रपटाच्या अंतिम ट्रेलरची वाट आतुरतेने पाहत आहेत.
'जवान' चित्रपटाचा अंतिम ट्रेलर होणार प्रदर्शित :'जवान' चित्रपटाच्या टीझर, पोस्टरसह 'जिंदा बंदा' आणि 'चलेया' ही दोन गाणी रिलीज झाल्यानंतर आता या चित्रपटाचा अंतिम ट्रेलर प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. काही दिवसापूर्वी 'जवान'चा प्रीव्ह्यू प्रदर्शित झाला होता. हा प्रीव्ह्यू प्रेक्षकांना खूप पसंत पडला. या प्रीव्ह्यूच्या पोस्टवर अनेकजणांनी कमेंट करत चित्रपटाबद्दल कौतुक केलं होतं. आता या आठवड्यातच 'जवान'चा अंतिम ट्रेलर प्रदर्शित होत असल्याने प्रेक्षक खूप उत्साहित झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर 'जवान'बद्दल चर्चा होताना दिसत आहे. 'जवान'चा ट्रेलर हा निर्माते चेन्नईमध्ये लाँच करणार आहेत.