मुंबई - Jawan day 1 box office prediction : शाहरुख खान आणि नयनतारा स्टारर 'जवान' चित्रपट रूपेरी पडद्यावर 7 सप्टेंबर रोजी सकाळी पहाटे 5 वाजता दाखल झाला आहे. 'जवान' हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होताच किंग खानचे चाहते चित्रपटगृहाबाहेर आनंद साजरा करू लागले आहेत. तसेच चित्रपटगृहांध्ये देखील शाहरुख एंट्री होताच चाहते आपला आनंद नाचून आणि शिट्या वाजवून व्यक्त करत आहेत. यापूर्वी पठाणनं बॉक्स ऑफिसवर 540 कोटींहून अधिक कमाई केली होती. आता 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चे रेकॉर्ड मोडेल असे सध्या दिसत आहे. 'जवान' चित्रपटाचा पहिला शो कोलकातामध्ये 5 वाजता सुरू झाला. त्यानंतर अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो 6 वाजता सुरू होऊ लागले.
'जवान' करू शकतो :शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट अंदाजे पहिल्या दिवशी देशांतर्गत 65-70 कोटी कमाई करू शकतो. ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म बुक माय शोनुसार ( BookMyShow)'जवान'चे 7.5 लाख तिकिटे आधीच आरक्षित झाल्यामुळे हा चित्रपट चांगली कामगिरी करेल असे त्यांनी सांगितले आहे. सुरुवातीच्या दिवशी 10 लाख क्षमतेपैकी सुमारे 25 टक्के तिकिटे विकली आहेत, जी पीव्हीआर (PVR) आयनोक्स (INOX) स्क्रीनवर गुरुवारी विकल्या गेलेल्या 2.5 लाख तिकिटांप्रमाणेच आहे. ही खूप मोठी संख्या आहे. या आकड्यानुसार असे दिसून येत आहे की हा चित्रपट ओपनिंग खूप जोरदार करेल. 'या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन हे पठाण' पेक्षा मोठे असू शकते', असे पीव्हीआर (PVR) आयनोक्स (INOX)च्या कार्यकारी संचालक संजीव कुमार बिजलीने सांगितले आहे.