मुंबई - शाहरुख खानचा अलिकडेच रिलीज झालेला 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करतोय. अॅटली कुमार दिग्दर्शित हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट आणखी एक मैलाचा दगड पार करण्याच्या दिसेने वाटचाल करत आहे. 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला जवान चित्रपट दोन आठवड्यानंतरही तिकीट बारीवर भक्कमपणे गल्ला जमवण्यात यशस्वी होतोय. असे असले तरी12 व्या दिवशी जवानच्या कमाईत थोडी घट नजरेस पडली.
अॅक्शन-पॅक्ड 'जवान' चित्रपटाने पहिल्या 12 दिवसांत चित्रपटगृहांमध्ये भारतात सुमारे 491.63 कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला. 13 व्या दिवशी किंग खानचा हा चित्रपट 12 कोटीची कमाई करेल असा अंदाज आहे. त्यामुळे १३ व्या दिवसाखेरीस सुमारे 505 कोटी रुपयांची एकूण कमाई भारतीय बॉक्स ऑफिसवर होईल. शाहरुखच्या जवानने त्याच्याच पठाण चित्रपटाचा विक्रम मागे टाकला आहे. पठाण चित्रपटाला 500 कोटींचा आकडा ओलांडायला 23 दिवस लागले होते.
'जवान' चित्रपटाच्या सक्सेस पत्रकार परिषदेत चित्रपटाचे दिग्दर्शक अॅटली कुमारने चित्रपट निर्मिसीठी कोटी रुपये खर्च झाल्याचं सांगितलं होतं. 'जवान' रिलीज झाल्यानंतर अगदी पहिल्या शोपासून हाऊसफुल्लचा बोर्ड झळकला होता चित्रपटाला देशभरातील चाहत्यांकडून आणि समीक्षकांकडून उत्तम सकारात्मक प्रतिसाद मिळालाय. या चित्रपटातील गाणी, संवाद आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांसाठी संसम्रणीय अनुभव देणारा होता. किंग खान शिवाय नयनतारा, विजय सेतुपती आणि छोट्या भूमिकेतील दीपिका पदुकोण लोकांच्या कायम स्मरणात राहतील.
जवान चित्रपटात सान्य मल्होत्रा, प्रियामणी, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य, लेहर खान, प्रियदर्शनी, सुनिल ग्रोव्हर, संजय दत्त अशी तगडी स्टार कास्ट शाहरुख, नयनतारा, विजय सेतुपती आणि दीपिका पदुकोणसोबत आहे. इतकी स्टार्सची मांदियाळी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर अभिनय करताना प्रेक्षकांनी अनुभवली. प्रत्येकाने आपआपली व्यक्तीरेखा चोख बजावल्याने चित्रपटाचा दर्जा खूप उंचावला. जवानच्या हिंदी आवृत्तीला जसा प्रतिसाद मिळतोय तसाच दाक्षिणात्या भाषातील चित्रपटांनाही उत्तम प्रतिसाद प्रेक्षकांनी दिलाय. हा चित्रपट भारताचा सर्वात मोठा चित्रपट ठरतोय यात मात्र कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही.