मुंबई Jawan Box Office Collection Day 3 : शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. लोकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ इतकी वाढला आहे की, हा चित्रपट पाहण्यासाठी खूप गर्दी होताना दिसत आहे. चित्रपटागृहांमध्ये शाहरुखच्या एंट्रीवर टाळ्या आणि शिट्ट्या वाजविल्या जात आहेत. शाहरुख आणि नयनतारा यांच्या जोडीला प्रेम भरभरुन मिळत आहे. 'जवान' हा चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरच नाही तर जगभरात देखील जबरदस्त कमाई करेल, असे सध्या दिसत आहे. या चित्रपटाची वाट प्रेक्षक खूप आतुरतेनं पाहत होते. या चित्रपटामधील गाणी देखील चाहते पसंत करत आहेत. जन्माष्टमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'जवान'नं पहिल्याच दिवशी चांगला व्यवसाय केला. 'जवान' चित्रपट रिलीजच्या तिसऱ्या दिवशी किती कमाई करेल हे जाणून घेऊया....
'जवान' एकूण कलेक्शन: सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'जवान'नं पहिल्या दिवशी 74.5 कोटीची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 53 कोटीचा बॉक्स ऑफिसवर व्यवसाय केला. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 127.50 कोटी झाले. हा चित्रपट रिलीजच्या तिसऱ्या दिवशी 70 कोटीचा आकडा ओलांडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 197.50 कोटी होईल. हा चित्रपट बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पहिल्या वीकेंडला कलेक्शनमध्ये खूप वाढ होईल, असे सध्या दिसत आहे. 'जवान'बद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटामध्ये शाहरुखची गर्ल गॅंग दाखवण्यात आली आहे, जी त्याला प्रत्येक मिशनमध्ये मदत करते.