मुंबई - Jawan Box Office Collection Day 20 : शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती स्टारर 'जवान' चित्रपटाच्या कमाईचा आलेख थोडा घसरला आहे, तरीही या चित्रपटाची कमाई समाधानकारक म्हणावी अशी आहे. 'बादशाह' शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट 20 दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेऊन आहे. 'जवान' हा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. 'जवान'नं अलीकडेच जगभरातील कलेक्शनच्या बाबतीत 'बाहुबली-2'चा विक्रम मोडला आहे. 'जवान'नं देशांतर्गत पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर 389.88 कोटीची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटानं 136.1 कोटींचा व्यवसाय केला.
'जवान'ची कमाई : अॅटली दिग्दर्शित या चित्रपटानं रिलीजच्या 19व्या दिवशी 5.30 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 566.08 कोटी इतके झाले आहे. हा चित्रपट आता रिलीजच्या 20व्या दिवसात आहे. 'जवान' 20व्या दिवशी 7 कोटींची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 573 कोटी होईल. या चित्रपटानं जगभरात 1000 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. आता देशांतर्गत हा चित्रपट लवकरच 600 कोटींचा टप्पा पार करेल. शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे.
'जवान' चित्रपटाच एकूण कलेक्शन
पहिला दिवस - 75 कोटी
दुसरा दिवस - 53.23 कोटी
तिसरा दिवस - 77.83 कोटी
चौथा दिवस 4 - 80.1 कोटी
पाचवा दिवस- 32.92 कोटी
सहावा दिवस - 26 कोटी
सातवा दिवस 23.2 कोटी
आठवा दिवस 21.6 कोटी
पहिल्या आठवड्याचे एकूण कलेक्शन - 389.88 कोटी
नववा दिवस 9 - 19.1 कोटी