मुंबई - Jawan box office collection day 12 : शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दिवसेंदिवस नवनवे कमाईचे रेकॉर्ड बनवून हा चित्रपट इतिहास रचत आहे. रिलीजच्या 10 व्या दिवशी सर्वाधिक वेगानं 400 कोटींचा टप्पा पार करण्याचा विक्रम 'जवान'नं केला. त्यानंतर या वीकेंडलाही या चित्रपटानं भरघोस कमाई करून अनेक बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले आहेत. 'जवान' चित्रपट 12व्या दिवशी किती कमाई करू शकतो हे जाणून घेऊया...
'जवान'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन :वर्षाच्या सुरुवातीला शाहरुख खानच्या 'पठाण'नं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली होती. यानंतर, 7 सप्टेंबर रोजी 'जवान' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून हा चित्रपट जोरदार कमाई करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या आठवड्यात या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 398.88 कोटी रुपये होते. 'जवान'नं दुसऱ्या वीकेंडला देखील बॉक्स ऑफिसवर खूप नोटा छापत आहेत. किंग खानच्या चित्रपटानं दुसऱ्या शुक्रवारी 19.1 कोटी रुपयांची कमाई केली, तर दुसऱ्या शनिवारी चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ झाली. या चित्रपटानं दहाव्या दिवशी 31.8 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर 'जवान'नं अकराव्या दिवशी 36.50 कोटीचा व्यवसाय केला आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 477.28 कोटी झालं आहे. हा चित्रपट बाराव्या दिवशी 14 कोटीचा व्यवसाय करू शकतो. यासह या चित्रपट एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 491.30 कोटी होईल. हा चित्रपट आता देशांतर्गत लवकरच 500 कोटीचा आकडा पार करेल असं सध्या दिसत आहे.