मुंबई Advance Booking : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या बहुप्रतीक्षित 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाची वाट आतुरतेने पाहत आहेत. या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग खूप झपाट्याने होत आहे. 1 सप्टेंबरपासून या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली होती. अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटानं जबरदस्त कमाई केली. अवघ्या 24 तासांत या चित्रपटानं तिकिट विक्रीमध्ये 10 कोटीचा टप्पा पार केला आहे. दरम्यान आता 'जवान'च्या हिंदी आवृत्तीसाठी अॅडव्हान्स बुकिंग सुमारे 5,41,126 इतकी झाली आहे. यासह या चित्रपटानं 15.59 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तमिळ आवृत्तीसाठी 19,899 तिकिटे विकली गेली, तर तेलुगु आवृत्तीमध्ये 16,230 तिकिटांची विक्री झाली आहे. 'जवान'नं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये देशांतर्गत 16.93 कोटीची कमाई केली आहे.
'जवान'ने रिलीजपूर्वीच केली जबरदस्त कमाई : 'जवान'च्या आश्चर्यकारक प्री-सेल्समुळे हा चित्रपट 100 कोटी रुपयांची ओपनिंग करू शकतो, असा दावा केला जात आहे. पठाणनंतर किंग खानला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहे. शाहरुखचा 'जवान' चित्रपट ब्लॉकबस्टर होणार असं सध्या दिसत आहे. आधीच अनेक चित्रपटगृहांमध्ये शो हाऊसफुल्ल झाले आहेत. त्याचबरोबर 'जवान' हा बॉलिवूड चित्रपटांसाठी आतापर्यंतचा सर्वाधिक प्री-सेल चित्रपट ठरला आहे. अॅटली दिग्दर्शित हा चित्रपट 7 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. 'जवान' हिंदीसह तमिळ आणि तेलुगु भाषांमध्ये रिलीज होईल.