मुंबई - Jawan Advance Booking :शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'जवान' 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. 'जवान'चे अॅडव्हान्स बुकिंग नुकतेच सुरू झाले आहे. चाहते या चित्रपटाचे तिकिटे सध्या बुक करत आहे. 'जवान' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 'जवान'ने रूपेरी पडद्यावर रिलीज होण्यापूर्वीच अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. चला तर मग जाणून घेऊया किंग खानच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्यापूर्वी किती कमाई केली तर...
'जवान'च्या तिकिटांची जोरदार विक्री सुरू : 'जवान' चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे. 'जवान'ची हिंदी आवृत्तीमधील आतापर्यंत 4 लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. आतापर्यंत तामिळ आवृत्तीची 8,000 हून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. याशिवाय तेलुगू आवृत्तीची 5,000 तिकिटे आतापर्यंत विकली गेली आहेत. आयमॅक्स थिएटरमध्ये हिंदी आवृत्ती पाहणाऱ्या प्रेक्षकांनी आतापर्यंत 11,000 पेक्षा जास्त तिकिटे बुक केली आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत 'जवान'च्या एकूण 4 लाख 26 हजार तिकिटांची विक्री झाली आहेत. हा चित्रपट रिलीज होण्यास अजून चार दिवस बाकी आहेत. म्हणजेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येईल तसतसा हा आकडा चांगलाच वाढणार आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 3 सप्टेंबरपर्यंत शाहरुख खानच्या चित्रपटाने केवळ भारतीय चित्रपटगृहांमध्ये अॅडव्हान्स बुकिंगद्वारे 13 कोटी 17 लाख रुपयांहून अधिक कमाई केली आहे.