मुंबई- Jawan advance booking बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाची सिने विश्वात हवा निर्माण झाली आहे. बहुप्रतीक्षित असलेला हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजआधी शाहरुख खान प्रमोशनच्या निमित्ताने दुबईत दाखल झाला. याठिकाणी त्याने जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफावर 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला. त्यामुळे चित्रपटाच्या प्रसिद्धीत आणखी भर पडली आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली आहे.
अॅटली दिग्दर्शित 'जवान' चित्रपटाच्या प्रॉडक्शन बॅनरने आपल्या ट्विटरवर लिहिले की, 'दुबईतल्या रील थिएटरमधील वातावरण फारच उत्सहवर्धक होते. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली आहे. तुमचे तिकीट बुक करा. जवान चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी जगात हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज होणार आहे.'
'जवान'च्या ओपनिंग डेचे प्रोजेक्शन आधीच इंडस्ट्रीमध्ये वितरीत झाले आहे. यामध्ये चित्रपटात सर्वाधिक कामगिरी करण्याची क्षमता असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर 'पठाण' चित्रपटाच्या आठ महिन्यानंतर 'जवान' चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर तिकीटे खपली आहेत. प्री बुकिंगमध्ये 'जवान'चे बुकिंग 'पठाण'ला मागे सारू शकते. पहिल्या दिवशी १.१७ लाख तिकीटे विकली गेली आहेत.
इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या अहवलानुसार कमी कालावधीत चित्रपटाने ४.२६ कोटींची अॅडव्हान्स बुकिंग पार केली आहे. भारतातही अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात होताच ११८२० तिकीटे झटपट विकली गेली आहेत. 'जवान' चित्रपटाच्या पहिल्या दिवशीची कमाई विस्मयकारक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करत सांगितले की, 'जवान'च्या अॅडव्हान्स बुकिंगचा ट्रेंड विलक्षण असा आहे. नॅशनल चेनमध्ये गुरुवारी पहिल्या दिवशी झालेल्या तिकीट विक्रीच्या अपडेटनुसार एकूण ७९,५०० तिकीटे विकली गेली आहेत.