Jawan Advance Booking : मुंबई - शाहरुख खानने ठाम ठरवून टाकलं आहे की २०२३ हे वर्ष किंग खानचे आहे. वर्षाची सुरुवात 'पठाण'च्या धमाक्याने केल्यानंतर त्याचा अॅटली कुमार दिग्दर्शित 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पद्धतशीर प्रमोशन सुरू होते. आज त्याचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर मिळालेला प्रतिसाद पाहता हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरण्याची शक्यता अधिक दुणावली आहे. गेल्या काही काळात बॉलिवूड चित्रपट रिलीज होणार असला की त्यातील त्रूटी शोधून ट्रोल करण्याचा पायंडा पडत चालला होता. याचा अनेकदा फटका बॉलिवूडसह इतर चित्रपटांनाही बसला. अगदी चित्रपटावर बहिष्कार घालण्याच्या मोहीमाही चावलल्या गेल्या. यातील कोणत्याही वादात 'जवान' चित्रपट अडकणार नाही याची खात्री निर्मात्यांनी बाळगल्याचे जवानचा ट्रेलर पाहून पटते
'जवान' चित्रपटाचे प्रदर्शन जवळ येत असताना त्याचा अॅडव्हान्स बुकिंगचीही जोरदार चर्चा सुरू आहे. वेगवेगळ्या अॅप्सवर बुकिंगची सुविधा उपलबद्ध होणार आहे. मुंबईतील पीव्हीआर आयकॉन( लोअर परेल ) पीव्हीआर ल्यूक्स आणि पीव्हीआर इन्फिनिटीसाठी बुकिंग सुरू झाले आहे. या थिएटर्समधील अॅडव्हान्स बुकिंगची तिकीटे संपली असल्याचे समजते. या ठिकाणी 'जवान' चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेतही रिलीज होणार आहे. बुक माय शोवर ४ लाख तिकीटांचा विक्री झाली झाली आहे. 'जवान' चित्रपटाचा तिकीट दर २५० रुपयांपासून २००० रुपयापर्यंत आहे. हा प्रतिसाद जवानच्या भवितव्याची नांदी ठरवणारा आहे.
सॅकनिल्कच्या अहवालानुसार अमेरिकेत 'जवान'ची १०४३० तिकीटांची विक्री झाली आहे. 'जवान' चित्रपटाला अमेरिकेत 'पठाण'हूनही अधिक ओपनिंग मिळू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकेशिवाय जर्मनी, ऑस्ट्रेलियामध्येही तिकीट विक्रीला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. भारतातही 'जवान'ची जबरदस्त क्रेझ निर्माण झाली आहे. बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता आणि दिल्लीत 'जवान' चित्रपटाची अॅडव्हन्स बुकिंग अद्याप सुरू झालेली नाही. मुंबईत २७ ऑगस्ट पासूनच मोजक्या थिएटर्समध्ये अॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली. मात्र केवळ १५ मिनीटातच सर्व तिकीचांची विक्री झाली.