महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

जान्हवी कपूरने आई श्रीदेवीच्या जयंतीदिनी शेअर केली भावनिक पोस्ट - श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर

हिंदी चित्रपटसृष्टीतील 'चांदनी' श्रीदेवीची आज १३ ऑगस्ट रोजी जयंती आहे यानिमित्ताने श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूरने तिच्या आईची आठवण करत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे

Etv Bharat
जान्हवी कपूरने आई श्रीदेवीच्या जयंतीदिनी शेअर केली भावनिक पोस्ट

By

Published : Aug 13, 2022, 12:18 PM IST

मुंबई हिंदी चित्रपटसृष्टीतील 'चांदनी' श्रीदेवी यांची आज (१३ ऑगस्ट) जयंती आहे. श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी झाला होता. श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूरने तिच्या आईची आठवण करत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. जान्हवीने आई श्रीदेवीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आई श्रीदेवीसोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, ''हॅपी बर्थडे मम्मा, मला तुझी दररोज आणि दर क्षणी आठवण येते, मी नेहमी तुला आठवत राहीन."

यापूर्वी श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी इंस्टाग्रामवर श्रीदेवीची आठवण जागवणारी पोस्ट लिहिली. बोनी कपूर निर्मित 'मॉम' या चित्रपटात श्रीदेवीने एका शिक्षिकेची भूमिका साकारली होती, जी तिच्या सावत्र मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या पुरुषांना मारते. या चित्रपटात श्रीदेवीसोबत नवाजुद्दीन सिद्दीकी, अक्षय खन्ना आणि पाकिस्तानी कलाकार सजल अली आणि अदनान सिद्दीकी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

कसा झाला श्रीदेवीचा मृत्यू- 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी घरच्या लग्नासाठी दुबईला गेल्या होत्या. संपूर्ण कुटुंब त्यावेळी दुबईत उपस्थित होते, लग्नाच्या तयारीच्या दरम्यान श्रीदेवी तिच्या खोलीच्या बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळून आली होती.

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीने नुकतेच 'बवाल' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आणि अभिनेत्रीचा चित्रपट 'गुड लक जेरी' 29 जुलै रोजी प्रदर्शित झाला. बवालमध्ये ती वरुण धवनसोबत दिसणार आहे.

हेही वाचा -राजू श्रीवास्तवच्या कुटुंबीयांनी दिली प्रकृतीची अपडेट

ABOUT THE AUTHOR

...view details