महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Janhvi Kapoor family vacay : कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियासह जान्हवी कपूर कौटुंबिक सुट्टीसाठी रवाना - जान्हवीचे कुटुंबीय

जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया एकत्र सुट्टी घालवण्यासाठी निघाले आहेत. जान्हवीचे कुटुंबीय आणि तिची जवळची मैत्रिण तनिषा संतोषी त्यांच्यासोबत सुट्टीला अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत.

Janvhi Kapoor family vacay
Janvhi Kapoor family vacay

By

Published : Mar 1, 2023, 2:13 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर शिखर पहारियासोबतचा तिचा कथित रोमान्स लपवून ठेवण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. अनेकवेळा एकत्र दिसलेले हे अफवा असलेले लव्हबर्ड्स आता सुट्टीसाठी रवाना झाले आहेत. ही गोष्ट खऱी आहे की हे जोडपे एकटेच सुट्टीसाठी बाहेर पडलेले नाहीत, तर त्यांच्यासोबत काही खास जवळचे स्नेहीदेखील आहेत.

जान्हवी कपूर शिखर पहारियासोबतच सुट्टीसाठी रवाना - मंगळवारी जान्हवी मुंबई विमानतळावर पावडर ब्लू सलवार सूटमध्ये दिसली. जान्हवीची धाकटी बहीण आणि महत्त्वाकांक्षी अभिनेत्री खुशी कपूर आणि त्यांची कॉमन फ्रेंड तनिषा संतोषी देखील विमानतळावर दिसल्या. जान्हवी आणि खुशीचे वडील बोनी कपूर विमानतळावर दिसले. मुलींनी विमानतळावर प्रवेश केल्यानंतर शिखरसोबत बोनी कपूर येताना दिसले होते. असे दिसते की जान्हवी आणि शिखरच्या नात्याला कुटुंबाने हिरवा कंदील दाखवला आहे कारण तो म्हणूनच कपूर कुटुंबासोबत सुट्टीवर गेला आहे.

डेटिंगनंतर विभक्त झाले होते जान्हवी आणि शिखर - काही वर्षांपूर्वी डेट केलेल्या आणि विभक्त झालेल्या जान्हवी आणि शिखर यांनी गेल्या वर्षीच्या शेवटी त्यांचा प्रणय पुन्हा सुरू केला. गेल्या वर्षी एका हॅलोविन पार्टीत दोघे एकत्र स्पॉट झाले होते आणि तेव्हापासून ते अनेकदा एकत्र स्पॉट झाले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या एंगेजमेंट पार्टीला उपस्थित राहण्यापासून ते सोनम कपूरच्या दिवाळी पार्टीसाठी एकत्र येण्यापर्यंत, जान्हवी आणि शिखर यांच्या एकत्रीत उपस्थितीने अनेक वेळा ठळक बातम्या झळकल्या होत्या.

जान्हवी कपूरचे आगामी चित्रपट - वर्क फ्रंटवर, जान्हवी पुढे नितेश तिवारीच्या बवाल चित्रपटामध्ये वरूण धवनसोबत दिसणार आहे. या अभिनेत्रीकडे शरण शर्मा दिग्दर्शित मिस्टर आणि मिसेस माही हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटदेखील आहे. या चित्रपटात जान्हवी तिच्या रुही चित्रपटातील सहकलाकार राजकुमार रावसोबत पुन्हा एकत्र येणार आहे. जान्हवीने दक्षिणेतही पदार्पण केले आहे असे म्हटले जाते परंतु अद्याप अधिकृतपणे काहीही जाहीर केलेले नाही. जान्हवीची आई श्रीदेवी ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीची सुपरस्टार होती. दक्षिणेतील सर्व दिग्गज दिग्दर्शकांसोबत आणि नामवंत प्रॉडक्शन हाऊससोबत तिने काम केले आहे. श्रीदेवीच्या निधनानंतर साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये जान्हवीबाबत सहानुभूमीची भावना आहे. त्यामुळे अनेक प्रॉडक्शन हाऊस जान्हवीला घेऊन चित्रपट बनवण्याची तयारी करत आहेत. आगामी काळात ती साऊथच्या मोठ्या बॅनरसोबत काम करताना दिसू शकते.

हेही वाचा -The Elephant Whisperers : द एलिफंट व्हिस्परर्सला सर्वोत्कृष्ट माहितीपट श्रेणीत नामांकन; प्रियांका चोप्राने केला निर्मात्यांनसोबत आनंद व्यक्त

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details