हैदराबाद (तेलंगणा) : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने ( Bollywood actor Janvhi Kapoor ) आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ( International Dance Day ) साजरा करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने थ्रोबॅक व्हिडिओ चाहत्यांसाठी शेयर केला आहे. अभिनेता करण जोहरच्या तख्तसाठी ( Karan Johar's Takht ) कथ्थकचे धडे घेत आहे.
रविवारी जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या कथ्थक क्लासेसमधील थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला. यात तिने रेखाच्या आंखों की मस्ती या गाण्यावर डान्स केले आहे. यामुळे जान्हवी रेखाची चाहती असल्याचे समजते. जान्हवी कथ्थकमधील बैठक भव नावाचे नृत्य करत आहे. यात २ वर्षांपूर्वी, माझ्या पहिल्या बैठकीपैकी एक प्रयत्न मी तुमच्यासोबत शेयर करत असल्याचेही संदेश पोस्ट करत आहे.