मुंबई: अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सुट्टी घालवत असल्याचं दिसत आहे. गुरुवारी, तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले ज्यामध्ये ती निळ्या निळ्या पाण्यामध्ये सुंदर पोझ देताना दिसत आहे. या फोटोमध्ये जान्हवी ही पांढर्या शर्टमध्ये सुंदर दिसत आहे. तसेच तिने तिचा नो-मेकअप लूक या फोटोमध्ये दाखवला आहे. जान्हवीच्या या फोटोंना युजरकडून अनेक लाईक्स आणि कमेंट्स मिळात आहे. एका वापरकर्त्याने सोशल मीडियावर कमेंटमध्ये लिहले, 'सुंदर,' तर दुसऱ्याने लिहले, 'किती मोहक,' तर आणखी एकाने लिहले, खूपच गोड अशा अनेक कमेंट या जान्हवीच्या फोटोवर येत आहे. दरम्यान, जान्हवीच्या वर्क फ्रंटवर बोलायला गेले तर ती 'मिस्टर आणि मिसेस माही' या स्पोर्ट्स चित्रपटामध्ये राजकुमार रावसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
टिमचे मानले आभार :नुकतेच तिने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. शूटिंग पूर्ण केल्यानंतर, तिने टीमचे आभार व्यक्त करत एक लांबलचक पोस्ट इंस्टाग्रामवर लिहली आहे. जान्हवीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, 'मी 2 वर्षानंतर आज पहिल्यांदा माझी बॅट उचलली आणि आता आम्ही शेवटी गुंडाळले आहे.. आज मला थोडे हलके झाल्यासारखे आणि आरामदायक वाटेल कारण आम्ही सर्वांनी या चित्रपटासाठी आमचा बेस्ट दिला आहे. पण मला एकप्रकारे रिकामे झाल्यासारखे वाटत आहे. एखाद्या कोऱ्या कॅनव्हास सारखे. मला असे वाटते की आम्ही युद्धात गेलो आणि परतलो, आणि मी अनेक अभिनेत्यांना अभिनय करताना पाहिले. तुझ्याशिवाय आम्ही हरलो असते आणि मी निश्चितपणे एक दिवशी कोसळले असते. सर तुम्ही आम्हाला तुमच्या खांद्यावर घेऊन अंतिम रेषेवर पोहोचले आणि याबद्दलची खात्रीसुद्धा केली. प्रत्येक लढाई ही एका सुंदर पेंटिंगसारखी वाटत आहे . आमची संपूर्ण एडी टीम!! तुम्ही खरे हिरो आहात. तुम्ही कधीही हार मानणार नाही आणि प्रतिकूल परिस्थितीत कधीही पायउतार करणार नाही, तुम्ही प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाता आणि तुम्ही प्रत्येक लढाई लढली आहे.' असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहून चित्रपटामधील काही टिममधील लोकांना टॅग केले आहे.