मुंबई :सुपरस्टार रजनीकांतचा चित्रपट 'जेलर' भारतीय बॉक्स ऑफिसवर खूप कमाई करत आहे. 'जेलर'ने जगभरात ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. रजनीकांतने २ वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले आहे. रजनीकांतच्या 'जेलर'ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. सध्या 'गदर २' आणि 'ओएमजी २' या स्पर्धेत मागे आहेत. रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून 'जेलर'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. चित्रपट पाहण्यासाठी परदेशातून प्रेक्षक देखील आले होते. रजनीकांतची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. त्यामुळे हा चित्रपट अनेक रिकॉर्ड तोडत आहे. दरम्यान 'जेलर'ने बॉक्स ऑफिसवर नवव्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेऊया...
जेलरची एकूण कमाई :बॉक्स ऑफिस ट्रॅकरच्या सुरुवातीच्या आकड्यांनुसार, 'जेलर'ने आठव्या दिवशी भारतात फक्त ९ कोटी कमावले आहे. त्यानंतर देशांतर्गत या चित्रपटाची एकूण कमाई २३५.८५ कोटीवर पोहोचली आहे. 'जेलर'ने जगभरात ४२६.७ कोटींची कमाई केली. 'गदर २' बद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने जगभरात ३६९ कोटींची कमाई केली आहे. मात्र 'गदर २' हा चित्रपट देशांतर्गत प्रचंड कमाई करत आहे. 'जेलर'ने पहिल्या दिवशी ४८.३५ कोटी, दुसऱ्या दिवशी २५.७५ कोटी, तिसऱ्या दिवशी ३४.३ कोटी, चौथ्या दिवशी ४२.२ कोटी, पाचव्या दिवशी २३.५५ कोटी, सहाव्या दिवशी ३६.५ कोटी, सातव्या दिवशी १५ कोटी, आठव्या दिवशी १०.२ कोटी आणि नव्या दिवशी ९ कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन २४४.८५ कोटीवर पोहचले आहे.