मुंबई - Two Zero One Four motion poster : 'टू झिरो वन फोर' या आगामी स्पाय थ्रिलर चित्रपटासाठी अभिनेता जॅकी श्रॉफ सज्ज झालाय. या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रसिद्ध झालंय. X ( जुन्या ट्विटरवर ) वर चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी हो पोस्टर शेअर करताना लिहिलंय, 'जॅकी श्रॉफची भूमिका असलेल्या 'टू शून्य वन फोर' मोशन पोस्टर आऊट झालंय...हा चित्रपट मार्च २०२४ मध्ये रिलीज होणार आहे.'
'टू झिरो वन फोर' या चित्रपटाची कथा कॅप्टन खन्ना या बुद्धिमान आणि अनुभवी निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची आहे. त्याच्यावर जेव्हा फिरोज मसानी या प्रमुख पाकिस्तानी दहशतवाद्याची चौकशी करण्याचं जबाबदारी सोपवली जाते तेव्हा त्याचं आयुष्य बदलून जातं. या मोहिमेमधून परदेशी गुप्तहेरांचा समावेश असलेला एक मोठे षडयंत्र उघडकीस येते.
'टू झिरो वन फोर' चित्रपटामध्ये जॅकी श्रॉफ निवृत्त अधिकारी कॅप्टन खन्ना ही भूमिका साकारत आहे. याबद्दल बोलताना जॅकी म्हणाला, 'टू झिरो वन फोर या चित्रपटाचा भाग बनणे हा एक आनंददायी प्रवास होता. ही एक अशी कथा आहे, ज्यात माझे पात्र गुंतागुंतीच्या प्रकरणाची हेरगिरी करतं. अशी भूमिका मी यापूर्वी कधीच साकारलेली नाही. हा चित्रपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारा सस्पेन्स आणि एक्शनने भरलेला एक थरारक रोलर कोस्टर राईड आहे.'
दिग्दर्शक श्रावण तिवारी यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितलं की, 'टू झिरो वन फोर चित्रपटातून आम्ही एक आकर्षक आणि अस्सल स्पाय थ्रिलर देण्याचं उद्दीष्ट समोरं ठेवलंय. यातून केवळ प्रेक्षकांचं मनोरंजन होत नाही तर हिरगिरीच्या एका अनपेक्षित अवकाशाची झलक पाहायला मिळते. साहस, कटकारस्थानं आणि न्यायासाठीच्या संघर्षाची ही एक कथा आहे. हा चित्रपट प्रेक्षकासमोर घेऊन येण्यासाठी आम्ही खूप उत्साही आहोत.'