महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

जॅकी श्रॉफ स्टारर 'हिरो' चित्रपटाला 40 वर्षे पूर्ण, कर्णमधुर बासरीच्या तालावर 'एक पिढी' आजही खुलते - हिरो

Hero Movie 40 Years : अभिनेता जॅकी श्रॉफच्या 'हिरो' या चित्रपटाला आज 40 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट 1983 साली प्रदर्शित झाला होता. रुपेरी पडद्यावर हा चित्रपट सुपर-डुपर हिट झाला होता.

Hero Movie 40 Years
हिरो चित्रपटाला 40 वर्षे

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 16, 2023, 5:25 PM IST

मुंबई Hero Movie 40 Years :हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता जॅकी श्रॉफच्या 'हिरो' या चित्रपटाला आज 40 वर्षे पूर्ण झाली आहेत. जॅकी श्रॉफचा हा मुख्य भूमिका असणारा पहिलाच चित्रपट होता. यातून त्यानं सिद्ध केलं की तो हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरहिट हिरो आहे. 'हिरो' चित्रपटाला प्रदर्शित होऊन 40 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जॅकीनं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला अनेजण पसंत करत आहेत. जॅकीचा पहिलाचं चित्रपट जबरदस्त हिट ठरला होता. या चित्रपटामधील गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती. जॅकीनं या चित्रपटाद्वारे चाहत्यांची मनं जिंकली होती.

'हिरो' चित्रपटाला 40 वर्षे पूर्ण :'हिरो'ची निर्मिती 16 डिसेंबर 1983 रोजी प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्या दिग्दर्शनाखाली करण्यात आली होती. आयएमडीबीच्या (IMDB) रिपोर्टनुसार, सुभाष घई यांनी या चित्रपटासाठी अनेक कलाकारांना ऑफर दिली होती, ज्यामध्ये संजय दत्त, कमल हासन आणि कुमार गौरवसारखे कलाकार होते. त्यावेळी संजयचं ड्रग्ज प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याचं नाव या यादीतून वगळण्यात आलं. त्यानंतर बाकी काही कलाकारांनी काही कारणास्तव हा चित्रपट नाकारला होता. शेवटी सुभाषजींची नजर तीन बत्ती परिसरातील चाळीत राहणाऱ्या जॅकी श्रॉफवर पडली. त्यांनी या चित्रपटासाठी जॅकीला फायनल केलं. अशा प्रकारे जॅकी श्रॉफला चित्रपट मिळाला.

'हिरो' चित्रपट झाला हिट :'जॅकी'च्या 'हिरो'नं बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. 'हिरो' चित्रपटात जॅकी श्रॉफशिवाय अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री, शम्मी कपूर संजीव कुमार, आणि अमरीश पुरीसारखे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटातील जॅकी आणि मीनाक्षीची जोडी प्रेक्षकांना खूप पसंत पडली होती. या रोमँटिक अ‍ॅक्शन ड्रामानं प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. या चित्रपटाला लक्ष्मीकांत-प्यारेलाल प्रसिद्ध जोडीनं संगीत दिलं आहे. जॅकी श्रॉफनं फिल्मी दुनियेत येण्यापूर्वी खूप संघर्ष केला होता. 'हिरो'सोबत त्याचे नशीब बदलले आणि तो सुपरस्टार झाला.

हेही वाचा :

  1. अभिनेत्री वैष्णवी धनराजला कुटुंबीयांकडून मारहाण, पोलीस ठाण्यात व्हिडिओ बनवून मदत मागितली
  2. किंग खानची सद्दी संपली? देशांतर्गत 'डंकी'चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू, धक्कादायक अहवाल आला समोर
  3. अबराम खाननं त्याच्या शाळेतील वार्षिक कार्यक्रमात वडील शाहरुख खानची सिग्नेचर पोझ दिली ; चाहत्यांनी केलं कौतुक

ABOUT THE AUTHOR

...view details