मुंबई :बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या आगामी रोमँटिक-फॅमिली ड्रामा चित्रपट 'जरा हटके जरा बचके'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या शहरांना भेट देऊन तिच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटात ती अभिनेता विकी कौशलसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यास एक आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे साराने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आपली सर्व ताकद लावली आहे. आता अभिनेत्रीने प्रमोशन दरम्यान तिने अनेक राज्यतील पदार्थ चाखले आहेत आणि तिच्या चाहत्यांना त्याची झलकही तिने दाखवली आहे.
'जरा हटके जरा बचके' चित्रपटाचे प्रमोशन :'जरा हटके जरा बचके' चित्रपटाच्या प्रमोशनशी संबंधित तिच्या नवीन व्हिडिओमध्ये, साराने विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ सादर केले आहेत आणि त्यांचा एक-एक या सर्व पदार्थाचा ती आस्वाद घेतला आहे. सारा कधी मिठाई तर कधी स्नॅक्स अशा तोंडाला पाणी आणणाऱ्या गोष्टी चाखून चाहत्यांना दाखवत आहे. हा व्हिडीओ शेअर करून सारा अली खान लिहिते की, 'जेव्हा तुम्हाला एवढे जेवण मिळते, मग दुसरे काय हवे? या व्हिडिओमध्ये सारा अली खान देसी लूकमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने हलक्या रंगाचा सूट परिधान केला आहे. केस दोन भागात विभागले असून मोकळे सोडले आहे. साराचा चेहऱ्यावर शार्प मेक-अप असून ती या लूकमध्ये एकाद्या राजकुमारी सारखी दिसत आहे.