हैदराबाद - It's Salaar Trailer Day : प्रभासचा बहुप्रतिक्षित 'सालार: भाग १ - सीझफायर' चित्रपटाच्या निर्मात्यांनी आगामी ट्रेलर रिलीजच्या भोवतीचा उत्साह वाढवला आहे. चित्रपटाचे निर्माते विजय किरागांडूर यांनी अपेक्षा वाढवण्यासाठी X वर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो ट्रेलर पाहात असताना दिसत आहे.
'सालार' ट्रेलरच्या रिलीजची लोक अतिशय उत्कंठतेनं प्रतीक्षा करत आहेत. 1 डिसेंबर रोजी 7 वाजून 19 मिनीटांनी हा ट्रेलर लॉन्च केला जाणार आहे. सोशल मीडियावर ट्रेलरची जबरदस्त चर्चा होताना दिसतेय. निर्मात्यांनी ट्रेलर लॉन्चपूर्वी "हा सलार ट्रेलर दिवस आहे" अशी घोषणा करणार्या पोस्टसह X वर खळबळ उडवून दिली आहे. विजयच्या टीझरच्या फोटोनंतर, उत्साही प्रभासच्या चाहत्यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर प्रतिक्रियांचा वर्षाव केला. "सालार ट्रेलर फ्रॉम टुडे" हा हॅशटॅग लॉन्च करण्यात आला. आधी कळवल्याप्रमाणे, आज संध्याकाळी सालार ट्रेलरचे लॉन्चिंग केले जाईल. निर्मात्यांनी अत्यंत अपेक्षित प्रमोशनल मटेरियल गुलदस्त्यात ठेवलं आहे. चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेच्या जवळ 'सालार' ट्रेलर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
'केजीएफ' साठी प्रसिद्ध असलेला दिग्दर्शक प्रशांत नील आणि 'बाहुबली' अभिनेता प्रभास एकत्र काम करत असल्यामुळे चित्रपटाबद्दलची हाईप वाढली आहे. या जोडीचा हा हाय-ऑक्टेन सिनेमॅटिक एक्स्ट्राव्हॅगान्झा तयार करण्याचा त्यांचा पहिला प्रयत्न 'सालार' असणार आहे. पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन आणि जगपती बाबू यांचा समावेश असलेल्या कलाकारांचे नेतृत्व करत प्रभासने सालारची मुख्य भूमिका साकारली आहे.