मुंबई - Leo trailer day: थलपथी विजयचे चाहते त्याच्या 'लिओ' चित्रपटासाठी खूप आतुर आहे. सुपरस्टार विजयच्या अॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'लिओ'चा ट्रेलर 5 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असल्याचं समजत आहे. विजय स्टारर 'लिओ' हा चित्रपट प्रदर्शित होण्यास काहीच वेळ उरला आहे. दरम्यान आता विजयचे अनेक चाहते सोशल मीडियावर खळबळ माजवत आहेत. आता सध्या सोशल मीडियावर 'लिओट्रेलरडे' (#leotrailerday) ट्रेंड करत आहे. विजयचे चाहते त्यांच्या 'लिओ' चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहे. एक्स हँडलवर 4 ऑक्टोबरच्या रात्रीपासून विजयचे चाहते 'लिओ' चित्रपटाबाबत अनेक पोस्ट करत आहेत.
'लिओ' ट्रेलरसाठी चाहते आहे आतुर :चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी चाहत्यांना सांगितलं होत की, चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून युए (U/A) प्रमाणपत्र मिळालं आहे. 'लिओ' चित्रपटाचा ट्रेलर चेन्नईच्या रोहिणी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांनी मॅशअप व्हिडिओ शेअर करण्याची विनंती केली आहे. हा व्हिडिओ देखील स्क्रीनवर दाखवू शकतात. या चित्रपटाची क्रेझ ही भारतात नाही तर जगभरात आहे. काही दिवसापूर्वी यूकेमध्ये या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला खूप प्रतिसाद मिळत होता. याशिवाय काही सिनेमा विश्लेषकच्या मते हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेक चित्रपटाचे रिकॉर्ड मोडू शकतो. सध्या या चित्रपटाचा क्रेझ हा तामिळनाडूमध्ये खूप पाहायला मिळत आहे.