मुंबई- बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल लवकरच दाक्षिणात्य चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. दिग्गज स्टार नंदामुरी बालकृष्णाच्या आगामी तेलुगू चित्रपटात तो भूमिका साकारेल. अभिनेता नंदामुरी बालकृष्णा हे सुपरस्टार एनटीआर यांचा मुलगा असून तेलुगू फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे. बालकृष्णाची प्रचंड लोकप्रियता असून तो भन्नाट अॅक्शन्स सिक्वेन्ससाठी ओळखला जोता. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरले नसून 'एनबीके 108' असे तात्पुरते शीर्षक घेऊन या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल रविपुडी करत आहेत.
खलनायकाच्या भूमिकेत अर्जुन रामपाल - फिल्म प्रॉडक्शन बॅनर शाइन स्क्रीन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटरवर अर्जुन रामपालच्या कास्टिंगबद्दलची बातमी शेअर केली. टीम एनबीके 108 प्रतिभावान राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता अर्जुन रामपालचे स्वागत करते. अर्जुन रामपाल हा त्याच्या तेलगू पदार्पणात खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचे ट्विटमध्ये म्हटलंय. ओम शांती ओम आणि रा.वन सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अर्जुन रामपालने सांगितले की, तो बालकृष्णासोबत चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहे. आपल्याला त्यांनी यासाठी निवडलंय, त्यामुळे खूप उत्साहित आहे व काम करायला खूप मजा येईल असेही त्याने म्हटलंय.