महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांना पुत्ररत्न प्राप्त - काजल अग्रवालला पहिला मुलगा

अभिनेत्री काजल अग्रवाल आणि तिचा बिझनेसमन पती गौतम किचलू यांनी मंगळवारी त्यांच्या मुलाचे स्वागत केले. काजल आणि तिच्या पतीने अद्याप आनंदाची बातमी शेअर केलेली नसली तरी फिल्म इंडस्ट्रीतील खात्रीदायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांना पुत्ररत्न प्राप्त
काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांना पुत्ररत्न प्राप्त

By

Published : Apr 20, 2022, 10:51 AM IST

मुंबई - अभिनेत्री काजल अग्रवाल आणि तिचा पती गौतम किचलू यांना मंगळवारी सकाळी मुलगा झाला. काजल आणि तिच्या पतीने अद्याप आनंदाची बातमी शेअर केलेली नसली तरी फिल्म इंडस्ट्रीतील खात्रीदायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आई आणि बाळ दोघांचीही तब्येत ठीक आहे.

"मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात मंगळवारी सकाळी बाळाचा जन्म झाला. आई आणि मूल दोघेही ठीक आहेत," असे सूत्राने न्यूजवायरला सांगितले. काजलचे चाहते नवजात मुलाची पहिली झलक शेअर करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. गौतमने जानेवारीमध्ये त्यांच्या पहिल्या मुलाची अपेक्षा असल्याचे जाहीर केल्यानंतर, काजलने तिच्या मातृत्वाच्या फोटोशूटमधील जबरदस्त फोटो शेअर केले होते.

काजल अग्रवाल आणि गौतम किचलू 30 ऑक्टोबर 2020 रोजी एका छोट्याशा खासगी समारंभात विवाहबद्ध झाले होते. या विवाहास फक्त त्यांच्या जवळच्या कुटुंबीयांनीच हजेरी लावली होती. एकमेकांसाठी बनलेल्या या जोडप्याने करोडो चाहत्यांची मने जिंकली आहेत. अलीकडेच, काजलने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहून तिने पतीला अद्भूत व्यक्ती म्हणत त्याचे आभार मानले होते.

हेही वाचा -काजल अग्रवालने शेअर केले नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details