नवी दिल्ली - चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्री यांचा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गोव्यात आयोजित 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI) ज्युरी हेड नदव लॅपिड यांनी या चित्रपटाला 'व्हल्गर प्रपोगंडा' म्हटले आहे, त्यानंतर भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलॉन यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल ज्युरी प्रमुखांना फटकारले आहे. राजदूतांनी नदव यांचे हे वक्तव्य वयैक्तिक असल्याचे म्हटले आहे. नदव लॅपिड यांच्या वक्तव्याची लाज वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
IFFI ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड काय म्हणाले होते? - गोव्यात आयोजित 53 व्या फिल्म फेस्टिव्हल समारंभाच्या समारोपाच्या वेळी, IFFI ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी 'द काश्मीर फाइल्स'चे वर्णन 'व्हल्गर प्रपोगंडा' म्हणून केले. ते म्हणाले, 'अशा फिल्म फेस्टिव्हलमध्ये असा चित्रपट पाहून मला आश्चर्य वाटते'. सिनेस्टार अनुपम खेर यांनीही इफ्फी ज्युरींच्या वक्तव्यावर आपली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करून इस्त्रायली फिल्म मेकर लॅपिड यांच्या ज्युरी प्रमुखावर निशाणा साधला आहे. त्याचवेळी चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीही हा काश्मिरींचा घोर अपमान असल्याचे म्हटले आहे.