मुंबई - Bigg Boss 17 : बिग बॉस 17 मध्ये सध्या जोरदार ड्रामा पाहायला मिळत आहे. शोमधील सर्व स्पर्धक आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहेत. 'उदारियां' या मालिकेमधील कलाकार ईशा मालवीय आणि अभिषेक कुमार यांच्यातही लव्ह-हेट रिलेशनशिप पाहायला मिळत आहे. अभिषेक आणि ईशा दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. आता ईशा आणि अभिषेक नात तुटलं आहे. ईशा या नात्यातून मुक्त झाली आहे, मात्र अभिषेक अजूनही ईशाच्या प्रेमात आहे. या शोमध्ये त्यांच्या चांगली बाँडिंग पाहायला मिळत आहे. याशिवाय या शोमध्ये दोघेही कधी खूप भांडताना दिसत आहे. दरम्यान आता या शोमध्ये ईशाचा कथित बॉयफ्रेंड समर्थ जुरेल हा एन्ट्री घेऊ शकतो.
ईशा कथित बॉयफ्रेंड होईल 'बिग बॉस 17'मध्ये एंट्री ? : मिळालेल्या माहितीनुसार समर्थ शोमध्ये प्रवेश करण्यास तयार आहे. या शोमध्ये जर समर्थनं एन्ट्री घेतली प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर खूप ड्रामा पाहायला मिळेल. समर्थच्या प्रवेशाबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. बिग बॉसचा हा शो जेव्हा प्रसारित झाला, तेव्हा ईशा आणि अभिषेकमध्ये जोरदार भांडण पाहायला मिळाली होती. हे दोघेही या शोमध्ये सलमान खानसमोर भांडू लागली होती. यावेळी ईशानं अभिषेकवर शारीरिक अत्याचाराचा आरोपही केला होता. त्यानंतर अभिषेकनं सांगितलं होत की, ईशानं त्याच्या चेहऱ्यावर नखे मारली होती. अभिषेक, जो अजूनही ईशावर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करू इच्छितो, परंतु त्याला आधी तिच्याशी मैत्री करायची आहे. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते, पण वैयक्तिक कारणांमुळे ते वेगळे झाले.