मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अलीकडे अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदासोबतच्या लिंकअपच्या अफवांमुळे चर्चेत आहे. दोघे रोमान्स करत असल्याच्या अफवा यापूर्वी ऐकू येत असल्या तरी, मुंबईतील तानिया श्रॉफच्या वाढदिवसाच्या पार्टीतील व्हायरल व्हिडिओने यावर शिक्कामोर्तब केले आहे.
अगस्त्य नंदाचा सुहानाला फ्लाइंग किस- सर्व अफवांना पूर्णविराम देऊन अमिताभ बच्चन यांचा नातू आणि श्वेता नंदाचा मुलगा अगस्त्य नंदा, सुहाना खानला तिच्या कारमध्ये घेऊन जाताना दिसला आणि शेवटी निरोप घेण्यापूर्वी तिला फ्लाइंग किस केला. दुसरीकडे, सुहानाने त्याला तितक्याच उत्सफुर्तपणे प्रतिसाद दिला आणि कार्यक्रमातून दूर निघून गेली. अगस्त्यचा सुहानाला फ्लाइंग किस देतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडिओ व्हायरल- आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुहानाला वाढदिवसाची होस्ट तानिया श्रॉफ, तिचा प्रियकर अहान शेट्टी, सुनील आणि माना शेट्टी आणि अगस्त्य हे सर्वजण कार्यक्रमातून बाहेर पडताना दिसतात. यात काळ्या चमकदार ऑफ शोल्डर गाऊन आणि खुल्या केसांमध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत होती.