मुंबई - Ira khan and nupur shikhare :बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची मुलगी आयरा खान आणि तिचा पती नुपूर शिखरे सध्या त्याच्या लग्नामुळं चर्चेत आहेत. हे जोडपे त्याच्या शाही लग्नासाठी उदयपूरला पोहोचले आहेत. या लग्नासाठी आमिर खान आझादसोबत काल उदयपूरला रवाना झाला होता. दरम्यान आयरा आणि नुपूरचा फ्लॉईटमधील उदयपूरला जाताना एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये आयरा आणि तिचा पती नुपूर शिखरे एकमेकांचा आधार घेऊन झोपलेले दिसत आहेत. आयरा आणि नुपूर या दोघांनीही सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आयरानं नुपूरच्या खांद्यावर डोके ठेवले असून दोघेही एकमेकांना बिलगून बसले आहेत.
आयरा-नुपरचं लग्न कधी? : 3 जानेवारी रोजी कुटुंबातील सदस्य आणि पाहुण्यांमध्ये नोंदणीकृत विवाह केल्यानंतर, हे जोडपे आता उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न करणार आहे. या जोडप्याचं लग्न 8 जानेवारीला होणार आहे. या लग्नात मनोरंजन, क्रीडा, राजकारण आणि व्यवसायातील दिग्गज व्यक्ती हजेरी लावणार आहेत. त्याचबरोबर अनेक मोठे स्टार्सही या लग्नाला उपस्थित राहू शकतात. आयरा आणि नुपूरचा पुन्हा एकदा विवाहसोहळा साजरा होत आहे, ज्यामध्ये संगीत सेरेमनी हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. यानंतर हे जोडपे 8 जानेवारीला शाही शैलीत सात फेरे घेतील. यानंतर 13 जानेवारीला या जोडप्याचं रिसेप्शन मुंबईत होईल. या कार्यक्रमात बी-टाऊनचे स्टार्स दिसेल.