महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

International Yoga Day 2023 :नियमित योगा करणारे बॉलिवूड सेलेब्रिटी - International Yoga Day 2023

दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करतात. या दिवशी संपूर्ण देशात वेगवेगळ्या भागात योग कार्यक्रम आयोजिते केले जात आहेत. त्यामुळे यामध्ये बी-टाऊन सेलिब्रिटी कसे मागे राहतील. योगा दिवसाच्या निमित्याने आपण काही खास सेलिब्रिटींना पाहूया जे नियमित योगा करतात.

International Yoga Day 2023
आंतरराष्ट्रीय योग दिन

By

Published : Jun 21, 2023, 11:32 AM IST

मुंबई : आरोग्य चांगले असेल तर शरीर निरोगी राहते आणि आजार होण्याची शक्यताही कमी असते. बी-टाऊन सेलिब्रिटीही यावर विश्वास ठेवतात. मलायका अरोरा असो वा शिल्पा शेट्टी आणि करीना कपूर, असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे योगा करतात आणि त्यांच्या चाहत्यांनाही योगा करण्यासाठी प्रेरित करतात. आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आणि योगासने सुरू करण्यासाठी हा चांगला दिवस आहे. येथे पहा तुमचे आवडते बॉलीवूड सेलिब्रिटी जे योग करून तंदुरुस्त राहतात आणि ज्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्ही देखील योग करू शकता.

शिल्पा शेट्टी : शिल्पा शेट्टी अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिला लोक योग क्वीन देखील म्हणतात. शिल्पा बऱ्याच दिवसांपासून योगा करत असून तिने योगाद्वारे तिच्या चाहत्यांमध्ये एक वेगळी ओळखही निर्माण केली आहे. शिल्पा अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर योगा करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

मलायका अरोरा :योग हा मलायकाच्या दिनचर्येचा एक मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. मलायका अरोरा फिट राहण्यासाठी योगा करते. तिच्या एका पोस्टमध्ये मलायका चक्की चालनासन करताना दिसली. या पोस्टमध्ये मलायकाने कॅप्शन लिहिले की, 'मी येथे करत असलेली पोज चक्की चालनासन नावाचे शक्तिशाली योग आसन आहे. हे आसन केल्याने पोटाचे स्नायू मजबूत होतात, पचनक्रिया सुधारते आणि मानसिक आरोग्य स्पष्ट होण्यासोबतच ताण कमी होण्यासही मदत होते. त्यामुळे हे आसन आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त आहे.

करीना कपूर : अभिनेत्री करीना कपूर अनेकदा योगा करताना दिसते. करिनाने तिच्या वर्कआउटचे व्हिडिओ शेअर केले आहेत ज्यामध्ये चाहते तिला योगा करताना पाहू शकतात. 'टशन' चित्रपट रिलीज झाल्यापासून करीना कपूर तिच्या फिटनेसमुळे चर्चेत आहे आणि आजही लोक तिच्या फिटनेसचे कौतुक करताना थकत नाहीत.

अनुष्का शर्मा :तिची मुलगी वामिकाच्या जन्मापूर्वी अनुष्का शर्माच्या योगा करतानाचा एक व्हिडिओ खूप चर्चेत आला होता. या व्हिडिओमध्ये अनुष्का योगा करत होती ज्यामध्ये पती विराट कोहली तिला सपोर्ट करत होता. अनुष्का गरोदरपणात हेडस्टँड करताना दिसली होती, ज्यावर तिने सांगितले की ती गरोदरपणातही योगा करते.

आलिया भट्ट : आलिया भट्ट ही आणखी एक अभिनेत्री आहे जी तिचा फिटनेस राखण्यासाठी योगा करते. आलिया घरी योगा करताना अनेक वेळा व्हिडिओ शेअर करते. लोकांनाही योगा करण्यासाठी ती प्रोत्साहन देत असते

सुश्मिता सेन :बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही देखील तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. सुष्मिताने अनेकदा वर्कआउटचे करण्याचे व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. २००६ मध्ये सुष्मिताला स्लिप डिस्कचा त्रास झाला होता. यातून बरे होण्यासाठी सुष्मिताने योगास करण्यास सुरूवात केली होती.

बिपाशा बसू :बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू योगाची ही देखील फिटनेस राखण्यासाठी योगा करते. तिने योगा वर्कआउट्सच्या स्वतःच्या फिटनेस डीव्हीडी प्रदर्शित केल्या आहेत. सोशल मीडियावरील फोटोंमध्ये ती अनेकदा तिचा पती अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत योगा करताना दिसत असते. याशिवाय ती लोकांनाही योगा करण्यासाठी प्रोत्साहित करते.

हेही वाचा :

Ram Charan upasana baby girl :'मेगा प्रिन्सेस'च्या भेटीसाठी अल्लू अर्जु हॉस्पिटलमध्ये, नात भाग्यवान असल्याचे चिरंजीवींचे मत

Ram Charan Upasana : राम चरण, उपासना कोनिडेलाच्या 'मेगा प्रिन्सेस'चा जयजयकार करण्यासाठी अपोलो रुग्णालयाबाहेर चाहत्यांची गर्दी

Dipika Chikhlia : चाहत्यांच्या मागणीनुसार 'रामायण' फेम अभिनेत्री दीपिका चिखलियाने धारण केले माता सीताचे रूप

ABOUT THE AUTHOR

...view details