मुंबई - गेल्या काही दशकांत आपल्याकडील सिनेमा 'मोठा' झाला. पूर्वी दोन फुलं एकमेकांना चिकटून असलेली दाखविली जायची जेणेकरून प्रेक्षकांना समजेल की हिरो हिरॉईन किस करताहेत. त्यानंतर दोघांचे ओठ एकदम जवळ आलेले दिसे आणि नंतर नायिका लाजत तोंड पुसत पळून जात असे, म्हणजे त्यांनी किस केलं असं अभिप्रेत असायचं. त्याउलट त्याकाळी पाश्चिमात्य सिनेमांत सर्रास चुंबनदृश्ये बघायला मिळायची आणि अनेक प्रेक्षक ते सीन्स बघण्यासाठी त्या सिनेमांना गर्दीही करीत. पुढे आपणही प्रोग्रसीव्ह झालो आणि पडद्यावर नायक नायिका किस करताना दिसू लागली. त्यातच मराठी चित्रपटही पुढे चालू लागला आणि त्यातही कधी कधी किसिंग सीन्स दिसू लागले. त्यामुळे मराठी कलाकारांना, सगळ्याच नाही, पडद्यावर किसिंग करण्यात वावगे वाटत नाही.
आता मराठी चित्रपटसृष्टीत नवीन पिढी कामं करतेय. आजच्या तरुणाईच्या मते किस करणे ही मामुली बात आहे आणि त्यात बाऊ करण्यासारखे काहीही नाही असे त्यांना वाटते. याच पिढीतील कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत वावरत असून चुंबनदृष्यांना त्यांचा आक्षेप नाहीये. परंतु काही मात्र अजूनही पडद्यावर किस करताना अवघडलेल्या स्थितीत दिसतात किंवा असतात. आता हेच उदाहरण बघाना. फकाट नावाचा एक नवीन चित्रपट येऊ घातलाय आणि त्यातील सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनीलच्या किसचा किस्सा चर्चेत आहे.
तर झाले असे की फकाट या चित्रपटाच्या एका सीन मध्ये सुयोग गोऱ्हेला रसिका सुनीलला किस करायचे होते. आता शक्यतो अश्यावेळी मुलगी अनकम्फर्टटेबल होण्याची शक्यता जास्त असते. परंतु इथे झाले उलटेच. रसिकाला चुंबन दृष्यासाठी काहीही आक्षेप नव्हता परंतु सुयोग कमालीचा अनकम्फर्टटेबल झाला. त्याने याआधी असा सीन न केल्यामुळे तो घाबरला होता आणि तो सीन कसा टाळता येईल हे बघत होता. त्याला किसिंग सीन करण्यापूर्वीच खूपच अवघडलेपण वाटत होते. परंतु रसिका सुनील ने त्याला घीर दिला आणि 'तो' सीन एकदाचा पार पडला.