मुंबई - इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात मुर्ती यांनी अभिनेत्री करीना कपूरने चाहत्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दलचा संदर्भ दिला आहे. करोडपती असलेल्या मूर्ती यांच्या मते करीनाने अहंकारातून चाहत्यांना दुखवले होते. यावर्षीच्या सुरुवातीस कानपूर आयआयटीत बोलत असताना त्यांनी याबद्दलचे सविस्तर विधान केले होते. त्यानंतर त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांनी करीनाच्या तसे वागण्याचे समर्थन केले होते.
नारायण मूर्ती म्हणाले होते की एकदा लंडनहून भारतात परतत असताना त्यांच्यासोबत करीना कपूरही प्रवास करत होती. त्यावेळी अनेकजण तिला येऊन तिची विचारपूस करत होते. मात्र ती सर्वांकडे दुर्लक्ष करत होती. ही गोष्ट नारायण मुर्ती यांना खटकली होती. याउलट मूर्ती यांना भेटणाऱ्या प्रत्येकाशी ते सौजन्याने बोलत होते, हाय हॅलो स्वीकार करत होते. यावेळी त्यांची पत्नी स्टेवर उपस्थि होती. त्यांनी मूर्ती यांना अडवले व करीना खूप दमली होती, तिचे लाखो चाहते आहेत, त्यामुळे ती सर्वांशी बोलू शकत नव्हती, असे म्हणत तिचा बचाव केला होता.
आयआयटीतील विद्यार्थ्यांना अहंकार सोडण्याबद्दल सांगताना करीनाच्या वागण्याचे उदाहरण नारायण मूर्ती यांनी दिले होते. यावेळी बोलताना मूर्ती म्हणाले होते की, 'मी त्या दिवशी लंडनहून परत येत होतो, आणि माझ्या शेजारी करीना कपूर तिच्या सीटवर बसली होती. बरेच लोक तिच्या जवळ आले आणि हाय हॅलो म्हणाले. तिने उत्तर देण्याचा त्रास करुन घेतला नाही. हे पाहून मी थोडा आचंबीत झालो. माझ्याजवळ जे लोक येत होते त्यांच्याशी मी थोडावेळ उठून बोलत होतो. त्यांना तेवढीच अपेक्षा असते,' असे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती कानपूर आयआयटीमध्ये बोलताना म्हणाले होते.
त्यांचे हे बोलणे त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांना पटले नाही. त्यावर त्या म्हणाल्या, 'तिचे लाखो चाहते आहेत. ती थकली असावी', त्या असे म्हणताच लोकांना हशा आणि टाळ्यांचा कडकडाट केला. त्यापुढे म्हणाल्या, 'मूर्ती एक संस्थापक आणि सॉफ्टेवअरमधील व्यक्ती आहेत. कदाचीत त्यांचे १० हजार चाहते असतील पण चित्रपट अभिनेत्रींना दहा लाख चाहते असतात.', असा सुक्तीवाद सुधा मुर्ती यांनी केला होता.