महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

इंडियन आयडॉलची रनरअप सायली कांबळेने बॉयफ्रेंड धवलसोबत बांधली लग्नगाठ - bride Saylee Kamble

इंडियन आयडॉल सीजन १२ ची स्पर्धक सायली कांबळेने तिचा बॉयफ्रेंड धवलसोबत लग्नगाठ बांधली आहे. तिने या सोहळ्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सायली कांबळे विवाह बंधनात अडकली
सायली कांबळे विवाह बंधनात अडकली

By

Published : Apr 25, 2022, 3:24 PM IST

मुंबई -सिंगिंग रिऍलिटी शो इंडियन आयडॉल सीजन १२ ची स्पर्धक सायली कांबळे विवाह बंधनात अडकली आहे. सायलीने तिचा बॉयफ्रेंड धवलसोबत लग्नगाठ बांधली आहे. तिने या सोहळ्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सायली आणि धवलने मराठमोळ्या पध्दतीने लग्न केले. रविवारी २४ एप्रिल २०२२ रोजी रॉयल गार्डन रिसॉर्टच्या बँक्वेटमध्ये हा लग्न सोहळा मोजके नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. सायलीच्या लग्नात इंडियन आयडॉल १२ चे काही स्पर्धकदेखील उपस्थित होते.

सध्या सायलीच्या साखरपुड्यापासून मेहंदी, हळदी आणि लग्न सोहळ्याचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वधूच्या वेशातील सायली अत्यंत सुंदर दिसत आहे. सायली आणि धवल गेली अनेक अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते.

सायली कांबळेने सप्टेंबर २०२१ मध्ये बॉयफ्रेंड धवलसोबत एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर तिच्या विवाहाची प्रतीक्षा तिच्या चाहत्यांना लगून राहिली होती.

लग्नाच्या व्हायरल फोटोत सायलीच्या चेहऱ्यावर सुंदर हसू आणि आनंद झळकताना दिसतोय. या फोटो व्हिडिओवर तिचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत.

कोण आहे सायली कांबळे?- इंडियन आयडॉलच्या Indian Idol 12 चा विजेता घोषित झाला. पवनदीप राजनने विजेतेपद मिळवलं तर अरुणिता कांजीलाल ही पहिली तर सायली कांबळे दुसरी रनरअप ठरली होती.

सायली कांबळेचा जन्म मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिचे वडील रुग्णवाहिकेचे चालक असून आई गृहिणी आहे.संगीतकार आनंदजी यांनी सायलीचे नाव बदलून सायली किशोर कांबळे असे नामकरण केले होते.सायलीला लहानपणापासूनच गायनाची आवड होती. तिच्या आई वडिलांनी तिची ही आवड जोपासली आणि तिच्या पाठीशी ठाम उभे राहिले. गायनाचा छंदच तिचा श्वास बनला आणि प्रसिध्दी मिळाली. पालकांच्या मदतीने तिने शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. अगदी सुरुवातीपासूनच तिने वेगवेगळ्या गायनाच्या स्पर्धा, इव्हेन्ट्स आणि कॉन्सर्ट्समध्ये भाग घ्यायला सुरुवात केली.

हेही वाचा -आलियाला बाहुपाशात घेतलेला रणबीरचा प्री वेडिंग फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details