मुंबई : बॉलिवूड निर्माता करण जोहर हा चित्रपटसृष्टीत आपल्या चित्रपटांसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्याने अनेक जबरदस्त चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्याचे अनेक चित्रपट रूपेरी पडद्यावर ब्लॉकबस्टर झाले आहेत. करण जोहरसाठी २०२३ वर्ष खूप खास आहे. तो भारतीय चित्रपटसृष्टीत आपले २५ वे वर्ष साजरे करत आहे. हे वर्ष भव्य बनवण्यासाठी, इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) येथे सहभागी झाला असून या महोत्सवात सहभीगी होणाऱ्या निर्मात्यांच्या प्रतिभेला त्याने सलाम केला आहे. या निर्मात्यांच्या योगदानामुळे अनेक चित्रपट हे चित्रपटसृष्टीला मिळाले त्यामुळे त्याने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्ते केली आहे.
विशेष स्क्रीनिंग करणार :११ ते २० ऑगस्टमध्ये चालणाऱ्या, शोकेस दरम्यान करण जोहर यांच्या सन्मानार्थ एक विशेष स्क्रीनिंग आयोजित करून भारतीय चित्रपटसृष्टीतील विलक्षण योगदानाचे प्रदर्शन इथे करणार आहे. १९९८ मध्ये 'कुछ कुछ होता है' या सुपरहिट चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या करण जोहरने आपल्या आगळ्यावेगळ्या दृष्टी आणि कहानीमुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तेव्हापासून, करणचे चित्रपटसृष्टीत खूप मोठे नाव झाले आहे. त्याचे अनेक चित्रपट आजही प्रेक्षकांना फार आवडतात. करणने भारतीय चित्रपटसृष्टीवर अमिट छाप सोडली आहे. उत्तम दिग्दर्शक म्हणून त्याने आपली जागा बॉलिवूडमध्ये बनवली आहे.