हैदराबाद- एसएस राजामौली दिग्दर्शित आरआरआर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म आणि सर्वोत्कृष्ट मूळ चित्रपटासाठी क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्समध्ये दोन पुरस्कार मिळाले. चित्रपटाला मिळालेले हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे यश आरआरआर टीमसाठी उत्साह वाढवणारे होते. अमेरिकेच्या या यशस्वी दौऱ्यावरुन आरआरचे स्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर हैदराबादला परत आले आहेत. इथ परल्यानंतर त्यांनी चक्क बारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंसोबत वेळ घालवल्याने चाहते खूश झाले आहेत. त्यांचे सोशल मीडियावरील फोटोंनी अक्षरशः धुमाकुळ घातला आहे.
राम चरण आणि ज्युनियर एनटीआर दोघेही 17 जानेवारी रोजी हैदराबादमध्ये क्रिकेट संघातील काही व्यक्तींना वेगवेगळ्या प्रसंगी भेटले. संक्रांतीच्या सुट्ट्या असल्याने हे कलाकार सुट्टीच्या मुडमध्ये असतानाच काही क्रिकेटर्सनी त्यांना भेटण्याची विनंती केली आणि त्यांनी आनंदाने त्यांची भेट घेतली.