मुंबई - Indian Cinema's Highest Grossing Film :अभिनेता आमिर खान गेल्या काही चित्रपटांमध्ये फ्लॉप ठरला आहे. मात्र आमिर खान हा असा सुपरस्टार आहे, ज्याच्या चित्रपटानं भारतीय चित्रपटसृष्टीत बॉलिवूड आणि साऊथमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा किताब पटकावला आहे. आमिर खान स्टारर 'दंगल' या चित्रपटाला आज 23 डिसेंबर रोजी 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. 'दंगल'नं कमाईमध्ये 'आरआरआर' , 'केजीए 2' आणि 'बाहुबली 2' या टॉप 3 सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांनाही मागं टाकलं होतं. 'चिल्लर पार्टी', 'भूतनाथ रिटर्न्स', 'छिछोरे', 'ब्रेक पॉइंट' आणि 'बवाल' या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी 'दंगल' बनवला आहे. या चित्रपटाची कहाणी, संवाद आणि पटकथा स्वतः नितेश यांनी लिहिली आहे.
'दंगल'ची स्टारकास्ट? :या चित्रपटात आमिर खाननं कुस्तीपटू महावीर सिंग फोगटची भूमिका साकारली आहे. तर साक्षी तन्वरनं महावीर यांच्या पत्नी दया शोभा कौरची भूमिका साकारली आहे. फातिमा सना शेखनं गीताची भूमिका साकारली आहे , तर सान्या मल्होत्रा बबिता कुमारीच्या भूमिकेत दिसली आहे. गीता आणि बबिता या दोन्ही कुस्तीपटू महावीरच्या चॅम्पियन मुली आहेत. 'दंगल' चित्रपट 23 डिसेंबर 2016 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाचं बजेट 70 कोटी रुपये होतं. आमिर खानच्या 'दंगल' या चित्रपटानं भारतात पहिल्या दिवशी 29.78 कोटींची कमाई केली होती. दंगलचं जगभरात 2023.81 कोटी रुपयांचे कलेक्शन झालं आहे. या चित्रपटानं भारतात एकूण 542.34 कोटीचं कलेक्शन केलं होतं. याशिवाय परदेशात या चित्रपटानं 1357.01 कोटीचा गल्ला जमवला होता.
बॉलिवूड चित्रपटाचं जगभरातील कलेक्शन
दंगल : जगभरात एकूण 2023.81 कोटी
भारतात 542.34 कोटी
परदेशात - 1357.01 कोटी
जवान- 1148.32 कोटी
पठाण- 1050.30
बजरंगी भाईजान - 969.06 कोटी
सिक्रेट सुपरस्टार - 905.7 कोटी
अॅनिमल - 862 कोटी