मुंबई -India vs Pakistan:भारतीय क्रिकेट संघानं क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तानचा पराभव केला. विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा सलग आठवा विजय आहे. पाकिस्तानचा संघ अवघ्या 191 धावांमध्ये बाद झाला. भारतानं 191 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत विजय मिळवला. दरम्यान हा सामना पाहण्यासाठी अनेकजण नरेंद्र मोदी स्टेडियमवर जमले होते. यामध्ये अनुष्का शर्मा आणि अरिजित सिंग यांसारख्या सेलेब्रिटीचादेखील समावेश होता. सेलिब्रिटी स्टेडियममध्ये उभे राहून भारतीय संघाला चीअर करत होते. आता या सामन्यामधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याध्ये अरिजित अनुष्काला फोटोसाठी पोझ देण्यासाठी सांगत आहे.
अरिजित सिंग आणि अनुष्का शर्माचा व्हिडिओ झाला व्हायरल : क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा भारतीय क्रिकेट संघाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती. याशिवाय गायक अरिजित सिंगदेखील स्टेडियममधून हा रोमांचक सामना पाहात होता. दरम्यान, जेव्हा अरिजितला अनुष्का थोडी लांब बसलेली दिसली. तेव्हा त्यानं तिला फोटोसाठी पोझ देण्यासाठी म्हटलं. त्यानंतर अनुष्कान देखील एक सुंदर पोझ फोटोसाठी दिली. आता सध्या अरिजित आणि अनुष्काचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एक्स फॅन पेजवर पोस्ट करण्यात आला आहे.
अनुष्का आणि अरिजित सिंगचा लूक : शेअर केलेल्या क्लिपमध्ये, अरिजित निळ्या पँटसह पांढरा शर्ट घातलेला दिसत आहे. दुसरीकडे, अनुष्कानं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओला अनेकजण लाईक करत आहेत. यावर आता चाहते कमेंट करत आहेत. एका यूजरनं कमेंट करत म्हटलं की,'अरिजित सारखा मी साधा व्यक्ती कधीच पाहिला नाही. यामुळेच मला हा व्यक्ती खूप आवडतो' दुसऱ्या एकानं लिहलं, 'अनुष्का ही खूप खास दिसत आहे'. अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट पोस्ट करत आहेत.
अनुष्का शर्माचा वर्कफ्रंट : अनुष्काला मोठ्या पडद्यावर दिसून बराच काळ लोटला आहे. शेवटी ती 2018 मध्ये शाहरुख खानसोबत 'झिरो' चित्रपटात दिसली होती. यानंतर तिनं 2020 मध्ये 'बुलबुल' चित्रपटाची निर्मिती केली. आता ती सध्या तिच्या 'चकडा एक्स्प्रेस' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीत आहे. अनुष्का शर्मा 5 वर्षांच्या विश्रांतीनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे.
हेही वाचा :
- Tanushree Dutta : तनुश्री दत्तानं राखी सावंतविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल...
- Ganapath : 'गणपथ : अ हिरो इज बॉर्न' या चित्रपटात टायगर श्रॉफ-क्रिती सेनॉनचा पाहायला मिळणार वेगळा 'अंदाज'...
- Parineeti Chopra : लग्नानंतर पहिल्यांदाच परिणीती चोप्रा केला रॅम्प वॉक ; व्हिडिओ आणि फोटो झाले व्हायरल...