महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी चाहत्यांना दिल्या शुभेच्छा... - राशि खन्ना

स्वातंत्र्यदिनी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी चाहत्यांना शुभेच्छा देऊन सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये काही कलाकारांनी व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.

Independence Day Celebration
स्वातंत्र्य दिवस

By

Published : Aug 15, 2023, 3:30 PM IST

मुंबई :आज देश स्वतंत्र होऊन ७७ वर्षे झाली आहेत. या खास प्रसंगी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड स्टार्स सारा अली खान, दीपिका पदुकोण, दिशा पटानी, मौनी रॉय, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित, दिया मिर्झा, नुसरत भरुचा, शाहिद कपूर, अजय देवगण,अनन्या पांडे, काजोल, ईशा गुप्ता, अनुष्का शर्मा आणि कियारा अडवाणी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर खास पोस्ट शेअर केली आहेत. याशिवाय टॉलिवूड स्टार्स समांथा प्रभू, प्रभास आणि राशि खन्ना यांनी देखील त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा देऊन एक खास पोस्ट शेअर केली आहे.

कलाकारांनी चाहत्यांना दिल्या शुभेच्छा :काजोलने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'गर्वाने सांगा- आम्ही भारतीय आहोत! स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.' दरम्यान आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक मोशन पोस्टर शेअर करत आपल्या चाहत्यांना आणि मित्रपरिवाराला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, दिशा पटानी आणि माधुरी दीक्षित यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर स्वातंत्र्य दिनाचे पोस्टर शेअर करून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वातंत्र्य दिवस
स्वातंत्र्य दिवस
स्वातंत्र्य दिवस

कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केल्या पोस्ट : दरम्यान अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कॅलेंडरसह 'भगतसिंग' चित्रपटातील एक फोटो पोस्ट केला आहे. हे शेअर करत त्यांने कॅप्शनमध्ये लिहिले की, आम्ही पॉवरफुल वर्ल्ड्सोबत स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच शाहिद कपूरनेही इन्स्टाग्रामवर देशभक्तीपर व्हिडिओ शेअर केला आहे. याशिवाय इंस्टाग्राम स्टोरीवर तिरंग्याचा फोटो शेअर करताना प्रभासने कॅप्शनमध्ये वंदे मातरम लिहिले आहे. तसेच राशी खन्नाने इंस्टाग्रामवर स्वातंत्र्य दिनानिमित्त तिचे खास फोटो शेअर केले आहेत आणि 'मॉं तुझे सलाम' वंदे मातरम' कॅप्शनमध्ये लिहिले आहे. पहिल्या फोटोत राशीने पांढरा टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे आणि हातात तिरंगा पकडला आहे. त्यानंतर काही फोटोत तिने भगवे, पांढरे आणि हिरव्या रंगाचे फुगे घेतले आहेत. या दोन्ही फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

स्वातंत्र्य दिवस
स्वातंत्र्य दिवस
स्वातंत्र्य दिवस
स्वातंत्र्य दिवस

कलाकारांनी असा केला स्वातंत्र्य दिन साजरा : दरम्यान ईशा गृप्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक तिचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिने पांढऱ्या रंगाचा सलवार शूट घातली आहे. यावर तिने तिरंगा घेतला आहे. कियारा अडवाणीने तिचा स्वातंत्र्य दिनाचा आठवडा वाघा बॉर्डरवर घालवला आहे. कियाराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही व्हिडिओ देखील पोस्ट केले आहेत. तसेच या स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमारने अखेरीस त्याचे भारतीय नागरिकत्व मिळाल्याची घोषणा केली. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, 'दिल और नागरिकत्व, दोनो हिंदुस्तानी. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!', असे त्याने लिहले. याशिवाय करण जोहरने देखील त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा :

  1. Akshay Kumar News : स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमारने सोशल मीडियावर शेअर केली 'ही' माहिती, ट्रोलरची केली बंद
  2. Omg 2 box office collection day 4 : 'ओह माय गॉड २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटींचा टप्पा केला पार
  3. Bigg Boss Ott 2 Grand Finale : बिग बॉस ओटीटी 2 चा इल्विश यादव ठरला विजेता

ABOUT THE AUTHOR

...view details