महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Independence day 2023 : देशप्रेम जागविणारे ६ चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित, सॅम बहादूर ते अटल बिहारींच्या भूमिका कोणते कलाकार करणार?

देशप्रेमाची भावना जागृत करणारे सहा हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. स्वातंत्र्यदिन देशभरात साजरा होत असताना या चित्रपटांची थोडक्यात माहिती घेऊ.

Independence day 2023
15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन

By

Published : Aug 15, 2023, 9:21 AM IST

हैदराबाद : गेल्या 76 वर्षात अनेक चित्रपट निर्मात्यांनी देशाचे सौंदर्य आणि शौर्याचे सिनेमात चित्रण केले आहे. तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल अशा आगामी बॉलीवूड चित्रपटांची यादी येथे देत आहोत. यामध्ये सॅम बहादुर ते मैं अटल हूँ या चित्रपटाचा समावेश आहे.

1. सॅम बहादूर : सरदार उधम सिंगची भूमिका केल्यानंतर विकी कौशल आणखी एका युद्धनायकाची भूमिका साकारणार आहे. यावेळी तो भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सॅम हे 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय सैन्यदलाचे प्रमुख आणि फील्ड मार्शल पदावर नियुक्त झालेले पहिले भारतीय सैन्यदलाचे कमांडर होते.

2.पिप्पा : इंशान खट्टर आणि मृणाल ठाकूर अभिनीत 1971 च्या युद्ध चित्रपटाची रिलीजची तारीख पुन्हा डिसेंबर 2023 मध्ये बदलण्यात आली आहे. पिप्पा हा ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता यांच्या लढाऊ संस्मरण द बर्निंग चॅफीजने प्रेरित चित्रपट आहे. हे 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारताच्या पूर्व आघाडीवर झालेल्या गरीबपूरच्या 48 तासांच्या लढाईच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

3.मैं अटल हूँ: मैं अटल हूँ हा रवी जाधव दिग्दर्शित आणि उत्कर्ष नैठानी लिखित आगामी हिंदी भाषेतील बायोपिक चित्रपट आहे. यात पंकज त्रिपाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

4.ए वतन मेरे वतन :1942 मध्ये वसाहतवादी भारतात बेतलेल्या या चित्रपटात सारा अली खान एका स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारत आहे. ही काल्पनिक कथा 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनादरम्यान घडलेली आहे. देशाच्या तरुणांचे शौर्य, देशभक्ती, त्याग आणि कल्पकतेची ही कथा आहे. कन्नन अय्यर दिग्दर्शित आणि दारब फारुकी आणि कन्नन अय्यर यांनी सह-लेखन केलेला हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध असणार आहे.

5.तेजस : तेजस हा एक आगामी देशभक्तीपर चित्रपट आहे. हा चित्रपट तेजस गिल या हवाई दलाच्या पायलटच्या अविश्वसनीय वाटणाऱ्या प्रवासाभोवती फिरतो. अनेक संकटांना तोंड देत आपल्या देशाची अखंड सेवा करणाऱ्या वीर सैनिकांना प्रेरणा देणारा आणि भारतीयांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करणारा चित्रपट आहे.

6.आणीबाणी : कंगना रणौत ही इमर्जन्सीची दिग्दर्शिका आणि निर्माती आहे. हा चित्रपट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. यात रणौतने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.

हेही वाचा :

  1. Ananya Panday invites troll : मनजोत सिंगपासून फोटोसाठी दूर गेल्याने अनन्या पांडेने दिले ट्रोलर्सना आमंत्रण
  2. Box office surprise: चायनीज चित्रपट 'नो मोअर बेट्स'ने ब्लॉकबस्टर 'बार्बी'ला टाकले पिछाडीवर
  3. The Great Indian Family: अतरंगी फॅमिलीची धमाल कथा, विकी कौशलने करुन दिली इरसाल कुटुंबियांची ओळख

ABOUT THE AUTHOR

...view details