महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 11:04 AM IST

ETV Bharat / entertainment

भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषक अंतिम सामान्यात आयोजित 'हे' खास शो

IND vs AUS Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलियनमध्ये लढत पाहिला मिळणार आहे. या सामान्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. हा सामाना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी अहमदाबादला पोहोचत आहेत. बीसीसीआयच्या ट्विटद्वारे या सामान्यादरम्यान अनेक सेलिब्रिटी परफॉर्म करणार असल्याचं समजत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामाना
IND vs AUS Final

मुंबई - IND vs AUS Final : वर्ल्डकपचा ​अंतिम सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. ही मेगा मॅच पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी जाणार आहेत. अहमदाबाद विमानतळावर सेलिब्रिटींचे आगमन सुरू झाले आहे. अलीकडेच, फलंदाज विकेटकीपर केएल राहुलची पत्नी अभिनेत्री अथिया शेट्टी अहमदाबाद विमानतळावर दिसली. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना 2023 विश्वचषक फायनल पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. स्टेडियममध्ये एअर शो आयोजित केला जाणार आहे. हा सामना खूपच रंजक असणार आहे. आतापर्यत भारत एकही सामाना हारलेला नाही, तर ऑस्ट्रेलियानं या स्पर्धेत फक्त दोनच सामने गमावले आहेत.

इनिंग ब्रेकमध्ये बॉलिवूड स्टार्स परफॉर्म करणार : या सामान्यामध्ये टीम इंडियाला आपले सर्वोत्तम द्यावे लागेल. लोकांच्या नजरा मोहम्मद शमी, सिराज आणि बुमराह यांच्यावर असतील. यासोबतच विराट कोहली, शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्याकडून लांबलचक खेळी खेळण्याची अपेक्षा अनेकांना आहेत. याशिवाय बीसीसीआयनुसार सामन्यादरम्यान इनिंग ब्रेकमध्ये बॉलिवूड स्टार्स डान्स करताना दिसेल.या सामन्यापूर्वी भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने अहमदाबादच्या आकाशात स्टंटबाजी करतील. हा एअर शो भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमद्वारे सादर केला जाईल. दुसऱ्या डावाच्या ड्रिंक्स ब्रेक दरम्यान चाहत्यांना लेझर आणि लाईट शो बघायला मिळेल.

सामाना पाहण्यासाठी 'या' सेलिब्रिटी राहणार हजर : बीसीसीआयच्या ट्विटनुसार चाहत्यांना सामन्यापूर्वी सूर्यकिरण आयएएफ एअर फोर्स शो बघायला मिळेल. यानंतर आदित्य गढवी पहिल्या डावातील ड्रिंक्स ब्रेक दरम्यान परफॉर्म करताना दिसेल. पहिला डाव संपल्यानंतर चाहत्यांना अर्ध्या तासाच्या ब्रेकमध्ये बॉलिवूड स्टार्स परफॉर्म करेल. संगीत दिग्दर्शक प्रीतम चक्रवर्ती, जोनिता गांधी, आकासा सिंग, नकाश अजीज, अमित मिश्रा आणि तुषार जोशी परफॉर्म करणार असल्याचं बीसीसीआयनं म्हटलं आहे. दुसऱ्या डावाच्या ड्रिंक्स ब्रेक दरम्यान चाहत्यांना लेझर आणि लाईट शो बघायला मिळणार आहे. हा सामान पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. याशिवाय माजी क्रिकेटपटू कपिल देव, सचिन तेंडुलकर, एम एस धोनी, बीसीसीआयचे सचिव जय शाह, राजीव शुक्ला. माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल , अभिनेते रजनीकांत, अमिताभ बच्चन, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी, अदानी समूहाचे मालक गौतम अदानी, अभिनेता शाहरुख खान, आमिर खान आणि रणवीर सिंग हजर राहून भारतीय टीमला चिअर करताना दिसेल.

हेही वाचा :

  1. कतरिना कैफ उत्कृष्ट अभिनेत्रीसोबत 'या' ब्रँडची आहे मालकीन
  2. Naal 2 : 'नाळ 2' चित्रपटावर महेश मांजरेकर फिदा, व्हिडिओतून केलं तोंडभरून कौतुक
  3. बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा मार्फ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details