Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व सुरू झालं आहे आणि अपेक्षित राडाही सुरू झालय. सोळा स्पर्धकांनी घरात प्रवेश केल्यानंतर कालच्या भागात त्रिशूल, मेघा, रोहित आणि प्रसाद हे चार सदस्य निरुपयोगी ठरले होते. पण बिग बॉसने सदस्यांना 'रुम ऑफ फॉर्च्युन' हे अनोखे सरप्राईझ दिले. स्पर्धकांच्यामध्ये अनभन सुरू झाल्याचे चित्र पहिल्या दिवासापासून पाहायला मिळत आहे.
आता या बिग बॉसच्या घरातील सदस्यांचे नॉमिनेशन सुरू झाले आहे. यासाठी भागात 'आटली बाटली फुटली' हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. नुकताच याचा प्रोमो रिलीज झाला आहे. आपल्याला जो स्पर्धक नॉमिनेट करायचा आहे, तो का करतोय हे सांगून त्याच्या डोक्यात चक्क बाटली फोडायची आहे. अशा नॉमिनेट होऊ शकतील अशा स्पर्धकांच्या डोक्यात आज बाटल्या फुटताना दिसणार आहेत.