मुंबई - Imran khan rumoured girlfriend : अलीकडेच अभिनेत्री किर्ती खरबंदानं तिचा 29 ऑक्टोबर 2023 रोजी वाढदिवस साजरा केला. ज्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सनं हजेरी लावली होती. दरम्यान या पार्टीला इमरान खान आणि त्याची कथित गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टनसह पार्टीत उपस्थित होता. पार्टीत दोघांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. इमराननं लेखाशी आपले नाते अधिकृत केले असल्याच्या, सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत. इमरान खाननं 2008 मध्ये 'जाने तू... या जाने ना' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याच्या या पहिल्याचं चित्रपटातून त्यानं चाहत्यांच्या मनात स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केलं होतं. त्यानंतर त्यानं किडनॅप, मेरे ब्रदर की दुल्हन, आय हेट लव स्टोरीज असा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं, मात्र त्याला पाहिजे तसे यश मिळालं नाही. 2015 मध्ये 'कट्टी बट्टी' चित्रपटात काम केल्यानंतर त्यानं चित्रपटांमधून ब्रेक घेतला.
इमरान खान झळकला गर्लफ्रेंडसोबत :इमरान खान सध्या लाइमलाइटपासून दूर आहे, मात्र कधी कधी तो आपले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. इमरानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं तर, 2019 मध्ये तो त्याची एक्स पत्नी अवंतिका मलिकपासून वेगळा झाला. दरम्यान तो लेखा वॉशिंग्टनसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. हे लव्हबर्ड्स किर्ती खरबंदाच्या वाढदिवसाच्या पार्टीत इंजॉय करताना दिसले. 30 ऑक्टोबर 2023 रोजी, किर्ती खरबंदानं तिच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन केलं होतं.