मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीज विभागात तिच्या चाहत्यांसोबत बेबी बंपमधील फोटो शेअर केले आहे. तिचे गरोदरपणाच्या घोषणेनंतर, तिने इंस्टाग्रामवर स्वतःचे फार मनमोहक फोटो पोस्ट केले आहे. या फोटोमध्ये ती बेबी बंपला हात लावतांना दिसत आहे. शिवाय ती या फोटोमध्ये फार उत्सुक आणि खुश दिसत आहे. तसेच तिने तिच्या आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर छोट्या बाळाचा ड्रेस आणि एक मामा नावाच्या लॉकेटचे फोटोही शेअर केले आहे. बेबी बंपमधील तिचे फोटो हे फार सुंदर दिसत आहे.
इलियाना डेट करत आहे कतरिना कैफच्या भावाला : बेबी बंपमधील मिरर सेल्फीमध्ये, इलियाना मॅचिंग ट्राउझर्ससह काळ्या रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला आहे. पहिल्या फोटोमध्ये ती आरशाकडे तोंड करून सेल्फी घेताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने तिचा बेबी बंप साइड अँगलमधून दाखवण्यासाठी तिने तिचा अँगल बदलला आहे. तिने फोटोंना कॅप्शन दिले, 'हे सर्व काही...अँगल्स आहे,' आणि त्यात तिने हसणारे इमोजी पोस्ट केले आहे. या फोटोंमध्ये, इलियानाच्या चेहऱ्यावर एक चमक दिसत आहे. इलियानाने एप्रिलमध्ये तिच्या गरोदरपणाची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. त्यानंतर, गर्भवती इलियानाने तिच्या वाढत्या बेबी बंपचा फोटो कॅप्शनसह शेअर केला होता. 'बंप अलर्ट'. इलियाना ही कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत असल्याचे समजत आहे. ते दोघे कतरिना आणि विकी कौशलसोबत मालदीव ट्रिपवर वेळ घालवताना दिसले होते, ज्यामुळे दोघांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या होत्या. कतरिनाने कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये करण जोहरला याबद्दलची पुष्टी दिली की, इलियाना आणि सेबॅस्टियनच्या दोघे ऐकमेकांना डेट करत आहे, आणि त्यानंतर सर्व अनुमानांना पूर्णविराम भेटला.