महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

IIFA 2023 Awards: दृश्यम 2 सर्वोत्कृष्ट फिल्म, आलिया, हृतिकला अव्वल पुरस्कार, तर कमल हासनचा जीवन गौरवने सन्मान - गोल्डन ट्रॉफी स्वीकारताना

आयफा २०२३ मध्ये तांत्रिक पुरस्कार पटकावल्यानंतर, 'गंगुबाई काठियावाडी'ने शनिवारी रात्री आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. आलिया भट्टला प्रमुख भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान मिळाला. वेड या मराठी चित्रपटासाठी प्रादेशिक चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख यांना देण्यात आला.

IIFA 2023 AwardIIFA 2023 Awardss
IIFA 2023 Awards

By

Published : May 29, 2023, 5:34 PM IST

अबुधाबी - आयफा २०२३ मध्ये तांत्रिक पुरस्कार जिंकल्यानंतर, संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटने शनिवारी रात्री आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. या चित्रपटासाठी आलिया भट्टला प्रमुख भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. चित्रपटाचे निर्माते जयंतीलाल गडा यांनी आलियाच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. आलियाचे आजोबा नरेंद्र राझदान यांची तब्येत बरी नसल्यामुळे ती हजर राहू शकली नव्हती.

कमल हासनचा जीवन गौरवने सन्मान

अजय देवगणच्या 'दृश्यम 2' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाची ट्रॉफी मिळाली आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट'साठी आर. माधवन यांना मिळाला. दरम्यान, हृतिक रोशनने 'विक्रम वेधा' मधील त्याच्या अभिनयासाठी प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची ट्रॉफी जिंकली. या चित्रपटात सैप अली खानचीही मबत््तवाची भूमिका होती. 'विक्रम वेधा' हा समान शीर्षक असलेल्या तमिळ चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक चित्रपट आहे, ज्यामध्ये आर. माधवन आणि विजय सेतुपती मुख्य भूमिका केल्या होत्या.

हृतिक रोशनसाठी 'विक्रम वेधासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची ट्रॉफी

ख्यातनाम अभिनेता-चित्रपट निर्माते कमल हासन यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले तेव्हा त्यांना स्टँडिंग ओव्हीशन मिळाले. गायक आणि संगीतकार ए.आर. रहमानने कमल हासन यांना हा पुरस्कार दिला.

गोल्डन ट्रॉफी स्वीकारताना, 'कमल हासनने कृतज्ञता व्यक्त केली आणि म्हणाला, मी चित्रपटसृष्टीत मोठा झालो... साडेतीन वर्षांचा असताना मी इथे आलो. ... मला या टप्प्यापर्यंत टिकून राहण्यासाठी तुम्ही दयाळूपणे वागलात... मी खूप आभारी आणि नम्र आहे.' कमलने 1960 मध्ये तामिळ चित्रपट 'कलथूर कन्नम्मा'मधून बालकलाकार म्हणून सुरुवात केली होती.

जुग गुग जियोसाठी अनिल कपूरला पुरस्कार

ज्येष्ठ अभिनेता अनिल कपूर यांना 'जुगजग्ग जीयो' मधील भूमिकेसाठी सहाय्यक भूमिकेसाठी (पुरुष) पुरस्कारही मिळाला.

काल्पनिक नाट्यमय चित्रपट 'ब्रह्मास्त्र: भाग एक - शिव' आणि 'गंगुबाई काठियावाडी' हे चित्रपट आयफा पुरस्कार सोहळ्यात मोठे विजेते ठरले. 'ब्रह्मास्त्र: भाग एक - शिवा'ला मिळालेल्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (श्रेया घोषाल, महिला आणि अरिजित सिंग, पुरुष) आणि मौनी रॉयसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (महिला) यांचा समावेश आहे.

आलिया भट्टला प्रमुख भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार स्वीकारताना निर्माते जयंतीलाल गडा

दिवंगत बॉलीवूड अभिनेता इरफान खानचा मुलगा, बाबिल खान याने 'काला' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष) पुरस्कार जिंकला आणि तो 'गंगूबाई काठियावाडी' मध्‍ये काम करणा-या संतनु माहेश्वरीसोबत शेअर केला. 'धोका अराउंड द कॉर्नर'साठी खुशाली कुमारला सर्वोत्कृष्ट पदार्पण (महिला) पुरस्कार मिळाला.

रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख

नेक्सा आयफा अवॉर्ड्स २०२३ मध्ये वेड या मराठी चित्रपटासाठी प्रादेशिक चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख यांना देण्यात आला. यावेळी दोघांनी केलेल्या भाषणाने उपस्थितांना हसू आवरता आले नाही.

हेही वाचा -Vivek Agnihotri deletes tweet : विवेक अग्निहोत्रीने नवाजुद्दीन सिद्दीकीच्या विरोधातील ट्विट हटवले

ABOUT THE AUTHOR

...view details