मुंबई: 20 नोव्हेंबरपासून गोव्यात सुरू असलेल्या 'इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'ची आज म्हणजेच 28 नोव्हेंबर रोजी सांगता झाली. मात्र, या सोहळ्याच्या शेवटी असे काही घडले, जे पाहून सगळेच थक्क झाले. कारण ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी स्टेजवर द काश्मीर फाइल्स या चित्रपटावर टीका केली होती. या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी सांगितले की, 'द काश्मीर फाइल्स' हा प्रोपगंडा अंतर्गत तयार करण्यात आला आहे.
उपस्थित सर्व लोकांसमोर नादव लॅपिड म्हणाले, आम्ही सर्वजण 'द कश्मीर फाइल्स' या १५व्या चित्रपटाने त्रस्त आणि आश्चर्यचकित झालो होतो, हा चित्रपट आम्हाला प्रचाराशिवाय दुसरे काही वाटले नाही. ही एक पूर्णपणे अश्लील आणि कमकुवत कथा होती. एवढ्या मोठ्या प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवासाठी हा चित्रपट पूर्णपणे निरुपयोगी आहे. पुढे नादव लॅपिड म्हणाले की, 'मी या प्लॅटफॉर्मवर उभा राहून माझ्या भावना चांगल्या प्रकारे मांडू शकतो, मला त्यात आराम मिळतो. अशी टीका टिप्पणी समजून घ्या आणि स्वीकारा कारण त्यासाठीच चित्रपट महोत्सव आयोजित केले जातात.