महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Adipurush screening : आदिपुरुष स्क्रीनिंगला इब्राहिम अली खानने नेटिझन्सचे घेतले लक्ष वेधून - इब्राहिम अली खान

सैफ अली खान त्याची मुले तैमूर अली खान आणि इब्राहिम अली खान यांच्यासोबत मुंबईत आदिपुरुष स्क्रिनिंगसाठी पोहोचले होते. सैफचा मोठा मुलगा इब्राहिमने आर्यन खानच्या क्लोदिंग लाइनमधून हूडी घालून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Adipurush screening
आदिपुरुष स्क्रीनिंग

By

Published : Jun 17, 2023, 4:16 PM IST

मुंबई :बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा मुलगा इब्राहिम अली खान आणि तैमूर अली खान यांच्यासोबत शुक्रवारी रात्री मुंबईत आदिपुरुष स्क्रीनिंगसाठी दिसला होता. आता, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी वडील आणि मुलांचा थिएटर स्क्रिनिंगसाठी पोहोचल्याचा व्हिडिओ सध्याला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, नेटिझन्समध्ये इब्राहिमच्या हूडीबद्दल उत्सुकता वाढली आहे, ज्याची किंमत 2 लाखांपेक्षा जास्त आहे.

आदिपुरुष स्क्रीनिंग : इंस्टाग्रामवर पापाराझी अकाऊंटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सैफला त्याच्या कारमधून कॅज्युअल लुकमध्ये बाहेर पडताना पाहिले जाऊ शकते. त्याने स्काय ब्लू टी-शर्ट आणि जीन्स परिधान केला आहे. शिवाय सैफने पापाराझी पाहून थंब्स-अप देखील केला आहे. या तिघांना एकत्र पाहून त्यांचे पापाराझी फोटो काढले. यावेळी सैफचा मुलगा तैमूर त्याच्या आयाजवळ फिरताना दिसला. तर, सैफचा मोठा मुलगा इब्राहिमने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या कपड्यांच्या ब्रँड डी यावोल एक्स (D'YAVOL X) मधील ब्लॅक हुडी परिधान केली होती. या हुडीत तो फार सुंदर दिसत होता यामुळे त्याने नेटिझन्सचे लक्ष यावेळी वेधून घेतले.

हुडीबद्दल चर्चा :सध्याला सोशस मीडियावर त्याच्या हुडीबद्दल चर्चा रंगताना दिसत आहे. शेअर केलेल्या या व्हिडिओवर फार जास्त प्रमाणात कमेंट आल्या आहे. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने कमेंट करत म्हटले आहे, 'जर मी माझ्या वडिलांना हे जॅकेट मागितले तर ते मला 2 लाख देऊ शकणार नाहीत पण मला नक्कीच 2 किक' देईल. दुसर्‍या एका वापरकर्त्याने कमेंट करत म्हटले, 'भाई माझी 750 वाली हुडी देखील चांगला लुक देते' आणखी एका वापरकर्त्याने म्हटले, 'आर्यन खान ब्रँड' असा कमेंट या व्हिडिओवर आल्या आहे.

आदिपुरुषला संमिश्र प्रतिसाद :दरम्यान, शुक्रवारी चित्रपटगृहात दाखल झालेल्या ओम राऊतच्या आदिपुरुषला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांनी याबद्दल उत्सुकता दाखवली असताना, समीक्षकांनी या चित्रपटाबद्दल मात्र आता नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटात राघवच्या भूमिकेत प्रभास, जानकीच्या भूमिकेत क्रिती सेनन आणि लंकेशच्या भूमिकेत सैफ अली खान आहे. हा चित्रपट 2D आणि 3D अशा दोन्ही स्वरूपात रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. याशिवाय हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नडसह पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे.

हेही वाचा :

  1. Dharmendra dances : नातवाच्या संगीत कार्यक्रमात 'मैं जट यमला पगला दिवाना' गाण्यावर थिरकला धर्मेंद्र
  2. Sushmita Sen-Rohman Shawl : सुष्मिता सेन आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल पुन्हा येणार एकत्र ?
  3. Netflix Tudum 2023 : आलिया भट्टने नेटफ्लिक्स इव्हेंटला गॅल गॅडोट, जेमी डोर्ननसह लावली हजेरी

ABOUT THE AUTHOR

...view details